IMPIMP

Pune Crime News | आई-वडिलांच्या भांडणात पाकिस्तानी असलेल्या तरुणाची ‘ससेहोळपट’?; ‘पाकिस्तानी’ म्हणून केली अटक

by nagesh
 Pune Crime News | Black marketing of grain on rationing in Pune! 2700 kg of rice was seized by the Khadak police from Bhawani Pethe in Daund taluka.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime News | कागदपत्राशिवाय पुण्यात बेकायदशीर वास्तव्य करणार्‍या व खोटी कागदपत्रे सादर करुन
भारतीय पासपोर्ट (Indian Passport) बनविणार्‍या पाकिस्तानी (Pakistani) तरुणाला पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे. आई
वडिलांच्या कौटुंबिक भांडणात आजीकडे येऊन राहिलेल्या तरुणाची ससेहोळपट झाल्याचे दिसून येत आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महम्मद अमान अन्सारी (वय २२, रा. भवानी पेठ) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत पाकिस्तानी नागरिक पडताळणी विभागाचे पोलीस अंमलदार केदार जाधव (Police Kedar Jadhav) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महम्मद अन्सारी याची आई ही भारतीय आहे. तिचा पकिस्तानी नागरिक असलेल्या अमान यांच्याशी निकाह झाला होता. लग्नानंतर त्या पाकिस्तानला गेल्या होत्या. त्यांचा युएईला वास्तव्य करण्याचा विचार होता. दरम्यान, त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर त्यांच्यात कौटुंबिक वाद निर्माण झाला. त्याची आई सध्या युएईमध्ये वास्तव्याला आहे. महम्मद हा जन्माने पाकिस्तानी आहे. त्याच्या शिक्षणासाठी २०१५ मध्ये तिने महम्मद याला पुण्याला आपल्या आईकडे (त्याची आजी, मामा) पाठविले. पुण्यात तो शिक्षण घेत असताना त्याने खोटी कागदपत्रे सादर करुन भारतीय पासपोर्ट बनविला. त्याचा वापर करुन त्याने पुणे व दुबई विमान प्रवास करुन तो आपल्या आईलाही भेटायला गेला होता. (Pune Crime News)

दरम्यान, विशेष शाखेच्या परदेशी नागरिक पडताळणी विभागातील पोलीस परदेशी नागरिकांचा शोध घेत असताना त्यांना महम्मद अन्सारी याची माहिती मिळाली. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने बेकायदेशीरपणे वास्तव करीत असून त्याने बनावट कागदपत्राद्वारे पासपोर्ट बनविला असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक तटकरे तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Pune Crime News | ‘Rabbit film’ of a young man who is Pakistani in the fight of his parents?; Arrested as a ‘Pakistani’

 

हे देखील वाचा :

Ramesh Bagwe | क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे काम तातडीने सुरू करा अन्यथा राज्यभर लढा उभारू – रमेश बागवे

Pradeep Uppoor Passes Away | ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पूर यांचे निधन

Modi Govt On Dearness Allowance | मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचार्‍यांना झटका ! 18 महिन्यांचा थकीत डीए मिळणार नाही

 

Related Posts