IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिरूर पोलिस स्टेशन (पुणे ग्रामीण) – सख्खा भाऊ बनला पक्क वैरी ! 28 वर्षीय वहिनीचा खून तर भावाच्या खुनाचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime News | Shirur Police Station (Pune Rural) - Murder of 28-year-old sister-in-law and attempted murder of brother

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   – Pune Crime News | नोकरी घालविल्याचा संशय घेवुन टेरेसवर झोपलेल्या भाऊ आणि वहिनीवर खुनी हल्ला करून वहिनीचा खून (Murder In Pune) करून भावाला गंभीर जखमी करणार्‍याविरूध्द पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) शिरूर पोलिस स्टेशनमध्ये (Shirur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Pune Crime News)

 

प्रियंका सुनिल बेंद्रे Priyanka Sunil Bendre (28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती सुनिल बाळासाहेब बेंद्रे (Sunil Balasaheb Bendre) हे खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. अनिल बाळासाहेब बेंद्रे Anil Balasaheb Bendre (25, सर्व रा. आंब्याचा मळा, आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरूध्द खुनाचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीचे वडिल बाळासाहेब पोपट बेंद्रे Balasaheb Popat Bendre (59) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी अनिलला भाऊ सुनिल बेंद्रेनेच आपली नोकरी घालवली असा संशय होता. सुनिल आणि त्यांची पत्नी प्रियंका हे घराच्या टेरेसवर झोपले होते. मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास आरोपी अनिलने व्यायाम करण्याच्या लोखंडी डंबेल, चाकु व विटाने मारून प्रियंकाचा खून केला तर सुनिल यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले.

 

शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत (PI Sureshkumar Raut) आणि इतर अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Shirur Police Station (Pune Rural) – Murder of 28-year-old sister-in-law and attempted murder of brother

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political News | शरद पवार-प्रकाश आंबेडकर यांची भेट सकारात्मक, वंचितच्या मविआ प्रवेशाला काँग्रेसचा विरोध नाही

Ratnagiri Refinery Survey | खारघर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळावी, अजित पवारांची सरकारला विनंती

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : औषधांच्या नावाखाली अवैध मद्याची वाहतूक ! सासवड राज्य उत्पादन शुल्ककडून मुळशीत 57 लाखाचा माल जप्त

Nandurbar Police News | नंदुरबार पोलिसांकडून तृष्णा शांतीसाठी जिल्हयात 30 ठिकाणी पाणीपोईची सोय ! पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद

 

Related Posts