IMPIMP

Maharashtra Political News | शरद पवार-प्रकाश आंबेडकर यांची भेट सकारात्मक, वंचितच्या मविआ प्रवेशाला काँग्रेसचा विरोध नाही

by nagesh
Maharashtra Political News | sharad pawar prakash ambedkar meeting positive for mavia pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Maharashtra Political News | अलीकडेच वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावरुन अनेक राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत. याच दरम्यान शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेली भेट (Maharashtra Political News) महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) सकारात्मक ठरली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या मविआ प्रवेशाला विरोध काँग्रेस (Congress) करत नाही, असे मत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केले.

 

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. आणि एक नसून दोन बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यानंतर त्यांनी शरद पवार यांची व्हाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात (Maharashtra Political News) चर्चांना उधाण आले. मात्र, यावर शरद पवार यांनी खुलासा करताना सांगितले की, प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी हे दोघेही कर्नाटकात काही जागा लढवत आहेत. निवडणुकीच्या (Karnataka Election) अनुषंगाने ही भेट झाल्याच्या चर्चांना शरद पवारांकडून दुजोरा देण्यात आला. तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या दोन नेत्यांची भेट महाविकास आघाडीच्या दृष्टीने सकारात्मक असल्याचे सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लोंढे म्हणाले, सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची भेठ मविआसाठी सकारात्मक घडामोड आहे. वंचितच्या मविआ प्रवेशाला काँग्रेसचा विरोध आहे का, असे विचारले असता लोंढे म्हणाले, काँग्रेस कधीही हातमिळवणी करण्याच्या विरोधात नव्हती, वंचित विकास आघाडी आणि मविआ एकत्र आली तर त्याचा मोठा फायदा होईल.

 

 

Web Title :- Maharashtra Political News | sharad pawar prakash ambedkar meeting positive for mavia pune

 

हे देखील वाचा :

Ratnagiri Refinery Survey | खारघर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळावी, अजित पवारांची सरकारला विनंती

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : औषधांच्या नावाखाली अवैध मद्याची वाहतूक ! सासवड राज्य उत्पादन शुल्ककडून मुळशीत 57 लाखाचा माल जप्त

Nandurbar Police News | नंदुरबार पोलिसांकडून तृष्णा शांतीसाठी जिल्हयात 30 ठिकाणी पाणीपोईची सोय ! पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमान नगर पोलिस स्टेशन – मुली बरोबर बोलू नको सांगितल्याने दुचाक्या दिल्या पेटवून

 

Related Posts