IMPIMP

Pune Crime News | रागाने पाहिल्याच्या कारणावरुन तरुणाला बेदम मारहाण, उरुळी देवाची येथील घटना

by sachinsitapure
Beating

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | रागाने पाहिल्याच्या कारणावरुन तीन जणांनी एका तरुणाला दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Pune Police) तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.15) रात्री आठच्या सुमारास उरुळी देवाची (Uruli Devachi) येथे घडला. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत ज्योतीरादित्य विक्रम भालेराव (वय-19 रा. सावली होम्स, उरुळी देवाची ता. हवेली) याने रविवारी (दि.17) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन तेजस थोरात, सत्या पांढर व एका अनोळखी व्यक्ती (सर्व रा. उरुळी देवाची) यांच्यावर आयपीसी 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी ज्योतीरादित्य भालेराव आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास फिर्य़ादी आणि त्याचा मित्र अभिषेक विरेंद्र पांडे हे धनगरवस्ती मधील पडक्या तळ्याच्या रस्त्याच्या बाजूला गप्पा मारत उभा होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. त्यांनी भालेराव याला ‘काय बघतो माज आला का’ असे म्हणत शिवीगाळ केली.

त्यावेळी भालेराव याने आरोपींकडे रागाने पाहिले. रागाने पाहिल्याच्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादी
व त्याचा मित्र अभिषेक यांच्यासोबत वाद घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच रस्त्याच्या कडेला पडलेल्या दगडाने ज्योतीरादित्य याला मारुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts