IMPIMP

Pune Crime News | बँकेने सील केलेल्या दुकानाचे कुलूप उघडून साहित्याची चोरी, 5 कर्जदारांवर FIR; भोसरी येथील प्रकार

by sachinsitapure

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | बँकेकडे तारण ठेऊन घेतलेल्या कर्जाचे हप्ते तसेच कर्जाची वेळेत परतफेड न केल्याने बँकेने दुकान सील केले होते. कर्जदारांनी बँकेने दुकानाला लावलेले कुलूप तोडून दुकानातील दोन लाखांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी दोन महिलांसह पाच कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास वसंत इलेक्ट्रोनिक्स (Vasant Electronics), जय महाराष्ट्र चौक, आळंदी रोड, भोसरी येथे घडला. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत बँकेचे कर्मचारी शिवाजी परशुराम खंडागळे (वय-56 रा. रो.हाऊस नं.45 नेरुळ, नवी मुंबई) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन वसंत श्रीपती दसगुडे, प्रवीण वसंत दसगुडे, प्रदीप वसंत दसगुडे व दोन महिला (सर्व रा. जय महाराष्ट्र चौक, आळंदी रोड, भोसरी) यांच्या विरुद्ध आयपीसी 447, 448, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जी.एस. महानगर को. ऑप. बँक.लि. (GS Mahanagar Co. Op. Bank Ltd.) या बँकेत नोकरी करतात. आरोपींनी फिर्यादी यांच्या बँकेच्या भोसरी शाखेतून कर्ज घेतले आहे. त्या कर्जासाठी आळंदी रोडवर असलेले दुकान बँकेकडे तारण ठेवले होते. कर्जाचे नियमितपणे हप्ते न फेडल्याने बँकेने न्यायालयाच्या आदेशानुसार दुकान सील केले. (Pune Crime News)

आरोपींनी बँकेची परवानगी न घेता बँकेने सील केलेल्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानाचा अनधिकृतपणे ताबा घेतला.
तसेच दुकानामध्ये बँकेने ठेवलेली महत्त्वाची कागदपत्रे, जुने कॉम्प्युटर व कॅश काउंटींग मशिन असा एकूण दोन
लाख रुपयांच्या वस्तू चोरुन नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Related Posts