IMPIMP

Pune Crime News | पत्नीला कर्करोग अन् मुलाची नोकरी गेलेली ! छायाचित्रकाराच्या कुटूंबातील तिघांनी उचललं टोकाचं पाऊल, पुण्यातील धक्कादयक घटना

by nagesh
Pune Crime News | Wife lost cancer and son’s job! The extreme step taken by three members of the photographer’s family, a shocking incident in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पत्नीला कर्करोग झालेला आणि मुलाची नोकरी गेली. सध्या घरीच असलेल्या 72 वर्षीय छायाचित्रकाराने टोकाचे पाऊल उचल्याची घटना हडपसर परिसरातील फुरसुंगीमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तिघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये छायाचित्रकाराचा मृत्यू झाला तर पत्नी आणि मुलाला ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Pune Crime News)

सुर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे Suryaprakash Harishchandra Abnave (70, रा. लक्ष्मी निवास, फुरसुंगी, हडपसर – Hadapsar Police Station) यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे Janabaisurya Prakash Abnave (60) आणि चेतन सूर्यप्रकाश अबनावे Chetan Suryaprakash Abnave (41) यांना पुढील उपचारासाठी ससून रूग्णालयात (Sasoon Hospital) दाखल करण्यात आले आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, अबनावे कुटूंब हे फुरसुंगीमधील भोसले व्हिलेजमधील लक्ष्मी निवासमध्ये रहावयास आहे. सुर्यप्रकाश अबनावे हे छायाचित्रकार असून ते सध्या घरीच होते. त्यांच्या पत्नी जनाबाई यांना कर्करोग झाला होता तर मुलगा चेतनची नोकरी गेली होती. तिघांनी सोमवारी सायंकाळी घराचा दरवाजा आतमधुन बंद केला आणि विषारी औषध प्राशन केले. सोमवारी दुपारी त्यांच्या आबनावे यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणी फोन उचलत नव्हते. त्यामुळे नातेवाईक त्यांच्या घरी आले.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

त्यावेळी ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांनी पोलिसांना याबाबतची खबर दिली.
त्यानंतर हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्यासह इतर पोलिस घटनास्थळी पोहचले.
मात्र, सुर्यप्रकाश आबनावे यांचा मृत्यू झाला होता.
त्यांच्या पत्नी आणि मुलाला ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नैराश्यातून आबनावे कुटूंबाने आत्महत्येचा प्रकार केला असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title : Pune Crime News | Wife lost cancer and son’s job! The extreme step taken by
three members of the photographer’s family, a shocking incident in Pune

Related Posts