IMPIMP

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 2 लाखाच्या लाच प्रकरणी महानगरपालिकेतील बडा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption department: A senior officer of the municipal corporation in the net of anti-corruption in the case of bribe of 2 lakhs

छत्रपती संभाजीनगर : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | 2 लाखाच्या लाचेची मागणी करून 50 हजार रूपयाची लाच घेणार्‍या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील (Chatrapati Sambhajinagar Municipal Corporation) एका अधिकार्‍यास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहेत (Chatrapati Sambhajinagar ACB Trap). त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (ACB Trap News)

विनोद मोतीराम पंडित Vinod Motiram Pandit (36, पद – रचना सहाय्यक (वर्ग-2), नेमणुक – विशेष भूसंपादन अधिकारी, विशेष घटक, नगर रचना व मुल्यनिर्धारण विभाग, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची वडिलोपार्जित जमीन रस्ता विस्तारीकरणामध्ये मनपा अतिक्रमण विभागाने ताब्यात घेतली होती (Chatrapati Sambhajinagar Bribe Case News). त्याविरूध्द तक्रारदार यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये रीट दाखल केली होती. त्या रीटवर उच्च न्यायालयाने तक्रारदार यांच्या बाजुने निकाल देत जमिनीचा मोबदला देण्याचे आदेश महानगरपालिकेला केले होते. सदरीलची फाईल पुढील कारवाईसाठी महापालिकेतील भूसंपादन अधिकार्‍यांच्या कार्यालयात आली होती. (ACB Trap News)

रचना सहाय्यक विनोद मोतीराम पंडित यांनी सदरील फाईल लवकरात लवकर क्लिअर करून त्यांना लवकर मोबदला देण्यासाठी 2 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची खातरजमा करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यावेळी सरकारी पंचासमक्ष विनोद पंडित यांनी पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून 50 हजार रूपये घेतले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक (Chatrapati Sambhajinagar ACB SP) संदीप आटोळे (Sandeep Atole),
अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe), पोलिस उप अधीक्षक मारूती पंडित (DySP Maruti Pandit)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर (PI Nandkishor Kshirsagar),
पोलिस हवालदार अशोक नागरगोजे, पोलिस रवींद्र काळे, पोलिस विलास चव्हाण,
पोलिस कपिल गाडेकर आणि पोलिस चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title : ACB Trap News | Anti-corruption department: A senior officer of the municipal corporation in
the net of anti-corruption in the case of bribe of 2 lakhs

Related Posts