IMPIMP

Pune Crime | पुण्यातील स्वारगेट परिसरातील अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 48 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Guptas 92nd MCOCA action till date against Criminals Nilesh Ghaiwal gang member and gang leader Rohit Akhade and his gang booked under mokka

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरातील (Pune Crime) स्वारगेट पोलीस ठाण्याच्या (Swargate Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 48 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार रविंद्र उर्फ बल्ली वसंत कांबळे (वय-30 रा. डायस प्लॉट, गुलटकेडी) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे (criminal) नाव आहेत. कांबळे याला एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात (Aurangabad Jail) एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे.

 

बल्ली कांबळे हा अट्टल गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह स्वारगेट, खडक (Khadak Police Station), विश्रामबाग (Vishrambag Police Station), चंदननगर पोलीस ठाण्याच्या (Chandannagar Police Station) परिसरात तलवार, कोयता, लाकडी बांबू यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत, अनैसर्गिक अपराध, बाललैंगिक अपराध यासारखे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 6 गंभीर गुन्हे स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर (Senior Police Inspector Balasaheb Kopner) यांनी आरोपी कांबळे याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर केला होता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन
गुन्हेगारावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 48 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर व पी.सी.बी. गुन्हे शाखा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

 

Web Title :- pune crime | pune criminal send to harsul jail for 1 year in aurangabad cp amitabh gupta has taken action against 48 people under mpda

 

हे देखील वाचा :

Pune News | थंडीत पुणेकरांचे मद्यप्रेम वाढले ! गतवर्षीपेक्षा यंदा मद्याची अधिक विक्री

OBC Reservation | ओबीसी राजकीय आरक्षणावरुन आता उपमुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका

Pune Job | पुण्यातील ‘या’ सरकारी विभागात डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts