IMPIMP

Pune News | थंडीत पुणेकरांचे मद्यप्रेम वाढले ! गतवर्षीपेक्षा यंदा मद्याची अधिक विक्री

by nagesh
Pune News | consumption and liquor sell increased november 2021 covid 19

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यात (Pune News) दारुच्या विक्रीमध्ये (Alcohol) लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. अलीकडे थंडीचे प्रमाण वाढले आहे. यातच पुणेकरांचे मद्यप्रेम वाढल्याचेही दिसत आहे. देशी दारूची विक्री 3.7 टक्क्यांनी तर विदेशी दारूची विक्री (Exotic liquor) 4.2 टक्क्यांनी वाढलीय. बिअरच्या (Beer) विक्रीत थेट 16.6 टक्क्यांनी वाढ झाली असून वाईनच्या विक्रीतही 11.4 टक्के वाढ झालीय. अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून (Excise Department) मिळाली आहे. दरम्यान, मद्यपानाच्या आहारी जाऊ नये, असा सल्ला डॉक्टरही देत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

 

वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनूसार, थंडीच्या दिवसात रक्त गोठते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. हृदयाचे ठोके अनियमित झाल्याने हृदयावर विपरित परिणाम होतो. यातच सतत मद्यपान केल्याने हृदयविकाराचा (Heart disease) झटका येण्याची शक्यता वाढते. थंडीचा आनंद घेण्यासाठी अनेकजण सतत मद्यपान करत असतात. अनेक कारणास्तव, नाहीतर सहलीवेळी, सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक लोक मद्यपान करताना दिसत असतात. त्याचबरोबर नेक जण ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून देखील मद्यपान करतात. परंतु, कोणत्याही वेळी केलेले मद्यपान आरोग्यास हानीकारकच असते, असा इशारा देखील वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला आहे.

दरम्यान, हृदयविकाराची लक्षणेही अतिमद्यपानामुळे थंडीच्या दिवसांतही घाम फुटणे, चक्कर, थकवा, अस्वस्थता, छातीत दुखणे असे त्रास जाणवू शकतात. तसेच, मद्यपानामुळे शरीरातील उष्णता आणि कमी तापमान यांचे संतुलन बिघडल्यास हायपोथर्मियाची स्थिती उद्भवू शकते. हृदयविकाराचे कोणतेही लक्षण किंवा भीती जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्वाचे असते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ऋतूपर्ण शिंदे (Dr. Rituparna Shinde) यांनी सांगितलं की,
‘मद्यपानामुळे हृदयातील रक्तवाहिन्या तात्पुरत्या प्रसरण पावतात.
परंतु, मद्यपानाचे हृदयावर आणि पर्यायाने संपूर्ण शरीरावर विपरीत परिणाम होतात.
त्यामुळे हिवाळ्यात अथवा इतर कोणत्याही ऋतूत कधीही मद्यपान शरीरासाठी हानीकारकच ठरते.

 

Web Title :- Pune News | consumption and liquor sell increased november 2021 covid 19

 

हे देखील वाचा :

OBC Reservation | ओबीसी राजकीय आरक्षणावरुन आता उपमुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका

Pune Job | पुण्यातील ‘या’ सरकारी विभागात डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

Sanjay Raut | शरद पवारांना खुर्ची देतानाचा फोटो व्हायरल; विरोधकांची टीका, संजय राऊत म्हणाले…

 

Related Posts