IMPIMP

Pune Cyber Crime | सायबर चोरट्याकडून महिलेला साडेसहा लाखांचा गंडा; परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Warje Police Station - 86 Lakh fraudster arrested by offering attractive returns

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Cyber Crime | परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेला सायबर चोरट्याने साडेसहा लाख रुपयांचा गंडा (Fraud Case) घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Cyber Crime)

 

याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेला काही महिन्यांपूर्वी अनोळखी व्यक्तीने मैत्रीची विनंती पाठविली होती. महिलेने शहानिशा न करता मैत्रीची विनंती स्विकारली. त्यानंतर त्यांच्यात संवाद वाढला. परदेशातील एका खासगी कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी चोरट्याने केली होती. परदेशातून महागड्या भेटवस्तू पाठविण्याचे आमिष त्याने महिलेला दाखविले. त्यानंतर नेहा शर्मा (Neha Sharma) नावाच्या महिलेने तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

परदेशातून पाठविलेल्या भेटवस्तुंचे खोके (पार्सल) विमानतळावर सीमाशुल्क विभागाने Custom Department (कस्टम) ताब्यात घेतले आहे. तातडीने काही रक्कम भरावी लागणार असल्याचे
शर्माने महिलेला सांगितले. त्यानंतर महिलेने तातडीने एका बँक खात्यात पैसे जमा केले.
त्यानंतर पुन्हा निरनिराळी कारणे सांगून आरोपींनी महिलेकडून पुन्हा पैसे घेतले.
फसवणूक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

 

Web Title :-  Pune Cyber Crime | Cyber thief extorts six and a half lakhs from woman; The lure of sending gifts from abroad

 

हे देखील वाचा :

Ramdas Athawale | रामदास आठवलेंनी घेतली राज्यपालांची भेट

Gayatri Datar | गायत्री दातारचं टेलिव्हिजनवर कमबॅक; ‘या’ मालिकेतुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Pune Crime | हॉस्पिटलविरूद्ध तक्रार केल्याने कुटूंब संपविण्याची धमकी, आठजणांविरूद्ध गुन्हा

Pune Crime | लक्ष्मी पूजनादिवशी बुधवार पेठेत वाहनांची तोडफोड करणारे टोळके जेरबंद

 

Related Posts