IMPIMP

Pune : न घाबरता लढायचं ! एकाच कुटुंबातील 5 जणांची ‘कोरोना’वर यशस्वी मात, 75 वर्षाच्या आईसह परतले घरी

by nagesh
pune : fighting without giving ann returns home after overcoming corona her 75 year old mother

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोक संक्रमित होत आहे. घरातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबच तणावाखाली येते. मात्र पुणे जिल्ह्यातील बकोरी या गावातील एका कुटुंबाने आपल्या संघर्षाचा अनुभव सांगून कोरोना संक्रमित लोकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. बकोरी गावातील निसर्गप्रेमी चंद्रकांत गोविंद वारघडे यांच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोनाने Corona गाठले. मात्र, या कुटुंबाने न घाबरता आणि एकमेकांना धीर देत कोरोनावर मात केली. यामध्ये वारघडे यांच्या 75 वर्षीय मातोश्रींचा देखील समावेश आहे. वारघडे कुटुंब कोरोनावर मात करुन आपल्या आईसह घरी परतले आहे.

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

वारघडे यांनी सांगितले की, सुरुवातीला त्रास होऊ लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने एका पाठोपाठ एक असे आम्ही सर्वजण एकाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो. यावेळी आम्ही न घाबरता, एकमेकांना आधात देत, सकारात्मक विचार ठेवले. त्यामुळेच 75 वर्ष वयाच्या आईसह आम्ही पाच जण कोरोनावर मात करुन घरी सुखरुप आलो आहोत.

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी केंद्राला करुन दिली ‘त्या’ कलमांची आठवण, तत्परतेने निर्णय घेण्याची मागणी

वारघडे यांनी सांगितले की, मुलगी धनश्री (वय-21) हिला पहिल्यांदा त्रास झाला. ताप आल्याने कोरोनाचा Corona संशय आला. तिची चाचणी करुन तिच्यावर लगेच उपचार सुरु केले. मात्र, दोन दिवसांत त्रास कमी न झाल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सर्वांच्या चाचण्या केल्या. आई कमल व पत्नी माया (वय-40) यांनाही त्रास झाल्याने त्यांना देखील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान चंद्रकांत आणि त्यांचा मुलगा धनराज (वय-21) यांना देखील त्रास होऊ लागला. अगोदर मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर शेवटी चंद्रकांत रुग्णालयात दाखल झाले.

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

जर ते आगोदर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असते तर संपूर्ण कुटुंबच खचले असते. यासाठी त्यांनी सगळ्यात शेवटी दाखल होण्याचा निर्णय घेतला. एकाच रुग्णालयात असल्याने थोडा धीर होता. त्यांना आईची जास्त काळजी वाटत होती. मात्र, प्रत्येकाने एकमेकांना धीर दिला. खूप सकारात्मक राहिले. यामुळे पाचही जण कोरोना मुक्त जाले. एकाच वेळी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

इस्रायलमध्ये बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरी; ४४ जणांच्या मृत्यूची शक्यता

खरंतर अशी वेळ कोणावरच येऊ नये. त्रास जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. घाबरून न जाता खूप सकारात्मक रहा. अन्य कुटुंबीय व मित्रांनीही आधार दिला. यामुळे कोरोनावर मात करणे सोपे झाले. सर्वांना एक विनंती आहे. प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करा. त्रिसूत्रीचे पालन केले तर काहीही भिती नाही, असा सल्ला चंद्रकांत वारघडे यांनी दिला.

Also Read :

…अन् आता निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले?

Devendra Fadanvis : …म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण

Chandrakant Patil : ‘ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; मुख्यमंत्री ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत’

Related Posts