IMPIMP

Chandrakant Patil : ‘ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; मुख्यमंत्री ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत’

by Team Deccan Express
bjp chandrakant patil slams cm uddhav thackeray over pandharpur results

सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यातील जनता महाविकास आघाडीला वैतागली असून या सरकारबद्दलचा संताप पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत व्यक्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी दिली आहे. पाटील यांनी भाजपाचे विजयी उमेदवार समाधान आवताडे यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले असून मतदारांचे आभार मानले आहेत. दरम्यान पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट झाली. महाविकास आघाडी सरकारवरील लोकांचा विश्वास उडाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत, हे या पोटनिवडणुकीतील जनतेच्या कौलावरून दिसून आल्याचे पाटील chandrakant patil यांनी म्हटले आहे.

Devendra Fadanvis : …म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण

पाटील chandrakant patil म्हणाले की, लोकांच्या मनात आघाडी सरकारबद्दल प्रचंड राग आहे. संधी मिळेल तिथे लोक व्यक्त करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतही साडेचौदा हजार पैकी 6 हजार ग्रामपंचायतीत भाजपाला विजय मिळाला आहे. विज कनेक्शन तोडणे, विविध नुकसानभरपाई खात्यात जमा केली नाही, शेतकऱ्यांना मदत नाही, पीकविम्याचा लाभ नाही, कोरोनाच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांना पॅकेज नाही, जे तुटपुंजे पॅकेज दिले त्याची अंमलबजावणी नाही आदी अनेक प्रश्नांनी लोक हैराण झाले आहेत. तसेच आमदार प्रशांत परिचारक आणि उमेश परिचारक यांनी एकदिलाने भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांना साथ दिली, त्यामुळे विजय मिळण्यास हातभार लागला. या विजयाबद्दल आपण परिचारक यांचेही अभिनंदन करतो, असे त्यांनी नमूद केले.

Also Read :

इस्रायलमध्ये बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरी; ४४ जणांच्या मृत्यूची शक्यता

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

पंकजा मुंडे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, ट्विट करुन दिली माहिती

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

Related Posts