IMPIMP

Pune Fire | पुण्यात एकाच रात्रीत शहरात आगीच्या 4 घटना ! साबण कंपनी, भाजी दुकान, AC डक्ट आणि ट्रक आगीत जळून खाक

by nagesh
Pune Crime News | Exciting! 2 children including a woman were killed and the bodies were burnt; Incident in Kondhwa

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Fire | शहरात काल रात्री एकाच दिवसात चार ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या. अग्निशामक दलाच्या (Pune Fire Brigade) जवानांनी या ठिकाणी जाऊन या आगी तातडीने विझविल्या. रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीमधील (Ramtekdi Midc) एका साबणाच्या कंपनीच्या शेडला मध्यरात्री मोठी आग लागली. अग्निशामक दलाला मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांनी आग लागली होती. साबण बनविण्यासाठी लागणार्‍या कच्चा मालाच्या शेडला ही आग (Pune Fire) लागली होती.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ज्वालाग्राही पदार्थ असल्याने ही आग वेगाने भडकली होती. अग्निशामक दलाच्या ४ गाड्यांनी तब्बल अडीच तास प्रयत्नांची शर्थ करुन ही आग विझविली. या शेडच्या कडेलाच तयार साबणाचा माल ठेवला होता. अग्निशामक दलाने ही आग तयार मालापर्यंत पोहचू नये यासाठी प्रयत्न करुन हा माल आगीपासून वाचविला. (Pune Fire)

 

हडपसरमधील (Hadapsar) भाजी मंडई येथील एका भाजीच्या दुकानाला मध्यरात्री १ वाजून ५५ मिनिटांनी आग लागली होती.
त्यात हे दुकान संपूर्ण जळून खाक झाले.

 

उंड्री (Undri) येथील एका इमारतीतील ए. सी डक्टला आग लागली होती. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती.
या इमारतीच्या शेजारी असलेल्या एका उंच इमारतीमधील नागरिकाला ही आग लागल्याचे दिसल्याने त्यांनी अग्निशामक दलाला कळविले.
कोंढवा फायर स्टेशनची गाडी तातडीने तेथे गेली.
त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकाच्या मदतीने ठेवलेले १० सिलेंडर तातडीने सुरक्षितस्थळी हलविल्याने मोठा अनर्थ टळला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मार्केट यार्ड (Marketyard) येथील कृषी पणन कार्यालयाबाहेर पार्क केलेल्या एका ट्रकला मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास आग लागली होती.
ट्रकच्या केबिनला आग लागल्याचे पाहून तेथील सुरक्षारक्षकाने अग्निशामक दलाला कळविले.
अग्निशामक दलाची गाडी तातडीने पोहचली व त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत ट्रकची केबिन जळून खाक झाली होती.

 

Web Title :- Pune Fire | 4 fire incidents in Pune city in one night Soap company vegetable shop AC duct and truck burned to the ground

 

हे देखील वाचा :

LPG Cylinder Rate | ‘एलपीजी’ सिलेंडरच्या दरात आज वाढ झाली की घट, जाणून घ्या 1 फेब्रुवारी ‘बजेट- डे’च्या दिवशी नवीन दर

Pimpri Corona Updates | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी घट, गेल्या 24 तासात 2942 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Blood Sugar | ‘या’ 6 लक्षणांवरून ओळखा तुम्ही सुद्धा डायबिटीजला बळी पडला आहात का?

 

Related Posts