IMPIMP

Pune Fire News | स्वारगेट बसस्थानकाजवळील हातगाडीवरील सिलेंडरने घेतला पेट; अग्निशमन दलाने वेळेत आग विझवून टाळला मोठा अनर्थ

by nagesh
Pune Fire News | A cylinder on a handcart near Swargate bus stand caught fire; The fire brigade extinguished the fire in time and averted a major disaster

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Fire News | रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या हातगाडीवरील गॅस सिलेंडरने (Gas Cylinder) अचानक पेट
घेतल्याने त्यात संपूर्ण हातगाडी जळून खाक झाली. त्याचवेळी अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानाने तातडीने आग विझविल्याने पुढील मोठा
अनर्थ टळला. (Pune Fire News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी खेडेकर यांनी सांगितले की, स्वारगेट बसस्थानकाच्या (Swargate Bus Stand) बाहेर अनेक हातगाड्यांवर गॅस सिलेंडरचा वापर होत असतो. तेथे आगीपासून संरक्षणासाठी कोणतीही यंत्रणा नाही. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला पहाटे २ वाजून ४६ मिनिटांनी कॉल आला. आम्ही अवघ्या ४ मिनिटात घटनास्थळी पोहचलो. तेथील एका हातगाडीवरील सिलेंडरला आग लागली होती. आग लागल्याचे पाहताच लोक तेथून पळून गेले होते. काही मिनिटे उशीर झाला असता तर सिलेंडरचा स्फोट होऊन मोठा अनर्थ घडला असता. तातडीने पाणी मारुन आग विझविण्यात आली.

 

 

Web Title :- Pune Fire News | A cylinder on a handcart near Swargate bus stand caught fire; The fire brigade extinguished the fire in time and averted a major disaster

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – उपचारासाठी आलेल्या महिलेवर बलात्कार करणार्‍या डॉक्टराला अटक

Maharashtra Sadan – Sudan Crisis | महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमीत सुखरूप दाखल

Ajit Pawar | पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचे नामंतर ‘राजगड’ करावं, अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 

Related Posts