IMPIMP

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll election | विधानसभा पोटनिवडणूक : चिंचवड मतदारसंघासाठी 510 तर कसबा पेठ मतदारसंघासाठी 270 मतदान केंद्रे

by nagesh
Pune News | Digital media in Pune were denied passes to reporters while Digital India was being empowered

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Kasba Peth Chinchwad Bypoll election | जिल्ह्यात २०५- चिंचवड (Chindhwad Assembly Constituency) आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Peth Assembly Constituency) पोटनिवडणूकीचा कार्यक्रम सुरू असून त्यानुसार मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दरम्यान या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll election)

 

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून राबवण्यात आला. यानुसार ५ जानेवारी २०२३ रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघात ३ लाख १ हजार ६४८ पुरुष, २ लाख ६४ हजार ७३२ स्त्री आणि ३५ तृतीयपंथी याप्रमाणे एकूण ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार संख्या आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत ४८ हजार १०६ ची वाढ झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

२१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात १ लाख ३६ हजार ८७३ पुरुष,
१ लाख ३८ हजार ५५० स्त्री आणि ५ तृतीयपंथी याप्रमाणे २ लाख ७५ हजार ४२८ याप्रमाणे मतदार संख्या आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत १५ हजार २५५ ची घट झाली आहे.

 

अंतिम मतदार यादीतील मतदारसंख्येच्या आधारे २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे तर
२०५- चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी ५१० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत,
अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली.

 

Web Title :- Pune Kasba Peth Chinchwad Bypoll election | Assembly by-elections: 510 polling stations for Chinchwad constituency and 270 polling stations for Kasba Peth constituency

 

हे देखील वाचा :

MLA Bachchu Kadu | ‘मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर…’, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

Vanita Kharat | वनिता खरातच्या उखाण्याने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली “सुमित तूच माझा महाराष्ट्र…”

Jaya Bhardwaj | ‘या’ भारतीय क्रिकेटरच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमके प्रकरण?

Related Posts