IMPIMP

Pune Minor Girl Rape Case | चुलता, आजोबाने केलेल्या अत्याचाराची माहिती दिली वडिलांना, वडिलांनीही केला १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार

by nagesh
Nagpur Crime | ninth class girl six months pregnant nagpur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Minor Girl Rape Case | उत्तर प्रदेशातील गावाकडे असताना चुलत्याने दमदाटी करुन तिच्यावर वर्षभर अत्याचार केला. आजोबांनी तिचा वारंवार विनयभंग (Molestation) केला. ही बाब तिने आपल्या वडिलांना चिठ्ठी लिहून कळविली. पुण्यात आल्यावर वडिलांनीच तिच्यावर गेली ४ वर्षे अत्याचार केला. अतिशय हुशार व बारावी सायन्समध्ये ही मुलगी शिकत आहे. कॉलेजमधील एका कार्यक्रमात या मुलीने समुपदेशकांना अंगावर काटा आणणारी अत्याचाराची ही हकीकत सांगितल्याने उजेडात आली. (Pune Minor Girl Rape Case)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Pune Police) तिच्या ४९ वर्षाच्या नराधम बापाला अटक (Arrest) केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिचे आई वडिल पुण्यात मोलमजुरी करुन रहातात. घरची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी फिर्यादीला उत्तर प्रदेशातील आपल्या मुळ गावी रहायला पाठविले. २०१६ ते २०१८ या काळात ही मुलगी साधारण १२ -१३ वर्षाची असताना मुळगावी ३३ वर्षाच्या चुलत्याने तिला दमदाटी करुन जबरदस्तीने एक वर्षभर तिच्याबरोबर वारंवार शारीरीक संबंध (Physical Relationship) केला. तिचे ७० वर्षाचे आजोबाही तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करुन तिच्याशी शारीरीक चाळे करीत असत. त्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये ती पुण्यात आईवडिलांकडे आली. तेव्हा तिने आपल्यावरील या अत्याचाराची माहिती चिठ्ठी लिहून वडिलांना कळविली. त्यानंतर तिचे वडिलच तिची आई बाहेर असताना तिच्यावर अत्याचार करु लागले. ५ नोव्हेबर २०२२ रोजी त्याने तिच्या आईला काही कारणास्तव बाहेर पाठवून तिच्यावर अत्याचार केला. (Pune Minor Girl Rape Case)

इतकी वर्षे अत्याचार सहन करत आलेल्या या मुलीने कॉलेजमधील एका कार्यक्रमात समुपदेशकापुढे
आप बिती सांगितली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून वडिलांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक मगदुम (Sub-Inspector of Police Magadum) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Cousin, grandfather informs father about abuse, father also abused 17-year-old girl

 

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | आई वडिलांना येरवडा जेलमध्ये सडविण्याची धमकी देऊन काकाचा १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार

Har Har Mahadev | हर हर महादेव चित्रपटावर बाजीप्रभू देशपांडेंच्या वशंजांची प्रतिक्रिया

Indrani Balan Foundation | इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतनी लोणी ग्रामस्थांना रुग्णवाहिका, उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते लोकर्पण

 

Related Posts