IMPIMP

Pune Mumbai-Expressway | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उद्या दोन तास ‘ब्लॉक’, वाहतुकीत केला ‘हा’ बदल

by nagesh
Pune Mumbai-Expressway | block on pune mumbai expressway for two hours on december 28

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune Mumbai-Expressway) मुंबईच्या देशेने जाणाऱ्या मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) काही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे मंगळवारी (दि.28) दुपारी 12 ते 2 या वेळेत पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग (Pune Mumbai Expressway) ‘ब्लॉक’ (Block) केला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबईकडे जाणाऱ्या दोन मार्गिका (Lane) बंद करण्यात येणार असून एका मार्गिकेवरुन वाहतूक सुरु ठेवली जाणार आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ‘ओव्हरहेड गॅन्ट्रीस्ट्रक्चर’ वर (Overhead Gantrystructure) फलक (व्हेरिएबल मेसेज बोर्ड-Variable Message Board) बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्याकडून मुंबईच्या (Pune Mumbai-Expressway) दिशेने जाणाऱ्या मार्गिका बंद करुन एकाच मार्गावरुन वाहने जाऊ दिली जाणार आहे. या नियोजित वेळेत सर्व अवजड व मालवाहतूक वाहनांना प्रवास करता येणार नाही. केवळी हलकी चार चाकी व इतर प्रवासी वाहनांनाच या मार्गिकेवरुन संथ गतीने जाता येणार आहे.

महामंडळाकडून करण्यात येत असलेल्या या कामामुळे अवजड वाहने किलोमीटर 56.100 येथे थांबवण्यात येणार आहेत. फक्त हलक्या वाहनांना पुढे जाण्यास मुभा असणार आहे. या नियोजनासाठी महामार्ग पोलिसांची (Highway Police) नेमणूक करण्यात आल्याची माहिती, महामार्ग सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक संजय सस्ते (Police Inspector Sanjay Saste) यांनी दिली. तसेच उद्या दोन तास वाहतूक बदल करण्यात येणार असल्याने वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Pune Mumbai-Expressway | block on pune mumbai expressway for two hours on december 28

 

हे देखील वाचा :

Gold Hallmarking | सोन्याचे अनिवार्य हॉलमार्किंग 256 जिल्ह्यांमध्ये लागू, सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्राला करायचाय विस्तार; जाणून घ्या यामुळे होतो कोणता लाभ ?

Crime News | भर पोलीस चौकीत महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Pune Crime | हडपसरमधील बंटर शाळेसमोर मोठा अपघात; डंपरने पादचाऱ्याला उडवले

 

Related Posts