IMPIMP

Pune Navratri 2021 | पुण्यात नवरात्रोत्सवात दांडीया, गरबा आणि मिरवणुकीला परवानगी नाही; पालिका आयुक्तांचे आदेश

by nagesh
Pune Navratri 2021 | Dandiya, Garba and processions are not allowed in Navratri festival in Pune; Order of Municipal Commissioner vikram kumar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पुणे शहरामध्ये यंदाही नवरात्रोत्सवात साधेपणानेच (Pune Navratri 2021) साजरा होणार आहे. या काळात गरबा (Garba) आणि रास दांडियाचे (Ras Dandiya) आयोजन आणि मिरवणुकीला मनाई (Pune Navratri 2021) करण्यात आली आहे. तर रावण दहनाला मर्यादीत व्यक्तींच्या परिस्थीत परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी मंगळवारी (दि.5) जारी केले आहेत. याशिवाय मंदिरे आणि प्रार्थनास्थळांच्या संदर्भातील आदेश जारी केले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

येत्या गुरुवारपासून नवरात्रोत्सवास (Pune Navratri 2021) प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजना लक्षात घेत आयुक्त विक्रम कुमार यांनी नियमावली लागू केली आहे. नवरात्री साजरी करताना नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, मंडप मर्यादित स्वरूपात असावा, मुर्तीची उंची 2 फूट ते 4 फूट एवढी असवी.
दर्शनासाठी ऑनलाइन व्यवस्था करावी, आरती, किर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करताना गर्दी करु नये.
तसेच देवी आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणूकांना परवानगी नाकारण्यात आली आहे.
दांडीया, रासगरबा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना (Cultural events) मनाई करण्यात आली आहे.
तर रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी कोरोना नियमांचे पालन करावे, गर्दी करुन नये असे आदेश आयुक्तांनी दिले.

मंदिराबाबत आदेश जारी

पुणे महापालिकेच्या हद्दीमधील पुणे (Pune Cantonment Board) व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (Khadki Cantonment Board)
हद्दीतील सर्व धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे गुरुवार पासून उघडली जाणार आहेत. महापालिकेने देखील याला परवानगी दिली आहे.
या ठिकाणी संबंधित व्यवस्थापन समिती किंवा ट्रस्टने सूचना केल्याप्रमाणे उपाययोजना करुन भाविकांना प्रवेश द्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

 

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश मंगळवारी (दि.5) जारी केले आहेत.
कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळी येणाऱ्या भाविकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक असणार आहे.
तसेच भाविकांची प्रवेशापुर्वी थर्मल गनने तपासणी करावी, हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करावा इत्यादी उपाययोजना संबंधित व्यवस्थापन समितीने कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तर भाविकांना प्रवेश देताना दोन जणांमध्ये शारिरिक अंतर पाळले जाईल याची खबरदारी घेण्यात यावी असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title : Pune Navratri 2021 | Dandiya, Garba and processions are not allowed in Navratri festival in Pune; Order of Municipal Commissioner vikram kumar

 

हे देखील वाचा :

HeartBurn | छातीत जळजळीच्या 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, कॅन्सर-हार्ट अटॅकचे असू शकतात संकेत, जाणून घ्या

FSSAI Recruitment 2021 | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये 255 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

Pune Corporation | लोहगाव येथील पठारे वस्तीतील 2 अनधिकृत इमारती पालिकेने केल्या जमीनदोस्त

 

Related Posts