IMPIMP

Pune NCP Kothrud Youth | विशेष मुलांसाठी होळी ! कोथरूड राष्ट्रवादी युवकचा एक अनोखा सामाजिक उपक्रम

by nagesh
Pune NCP Kothrud Youth | Holi for special children A unique social initiative of Kothrud Nationalist Youth

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune NCP Kothrud Youth | आज होळीच्या निमित्ताने बावधन स्थित अनिकेत सेवाभावी संस्था संचलित मतिमंद मुलामुलींचे निवासी पुनर्वसन प्रकल्प येथे कोथरूड राष्ट्रवादी युवक वतीने विशेष कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) व त्याच्या सहकाऱ्यांनी या विशेष मुलांसाठी नाश्त्याचे आयोजन केले व त्यांच्यासोबत होळीचे अनेक रंग उधळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. चिमुकल्यांसोबत हे युवा कार्यकर्तेही मग्न होऊन सण साजरा करत असल्याचे या वेळी बघायला मिळाले. (Pune NCP Kothrud Youth)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

युवाशक्ती च्या सहाय्याने आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या सर्व युवा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मदतीने त्यांचे अध्यक्ष गिरीश गुरनानी वेळोवेळी असे कार्यक्रम आयोजित करत असतात. समाजसेवेचे अविरत व्रत या सर्व युवांनी घेतले असल्याचे या सर्व कार्यक्रमांमधून दिसून येते. या मुलांच्या निरागस आनंदात हरवून गेल्याचे आणि त्यांच्या हर्शोल्हासाने होळी या सणाचा उत्साह द्विगुणित झाल्याचे गुरनानी यांनी या प्रसंगी सांगितले.

 

सदर कार्यक्रमास कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवकचे अमोल गायकवाड, सुनील हरळे, ओमकार शिंदे, सौरभ ससाणे, ऋषिकेश शिंदे आदि कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title :- Pune NCP Kothrud Youth | Holi for special children A unique social initiative of Kothrud Nationalist Youth

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut ON AIMIM Offer | एमआयएमने राष्ट्रवादीला दिलेल्या युतीच्या ऑफरवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Gold Price Today | खुशखबर ! आठवडाभरात सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या दर

NCP Jayant Patil On AIMIM Alliance | ‘एमआयएमला जर महाविकास आघाडीमध्ये यायचं असेल तर…’; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य !

 

Related Posts