IMPIMP

Pune NCP | पुण्यात सामाविष्ट केलेली गावे वगळण्याचा शिंदे-फडणवीसांचा मोठा डाव, राष्ट्रवादीने केला गंभीर आरोप

by nagesh
Shinde-Fadnavis Government | Another failure of the Shinde-Fadnavis government, another project lost in the hands of Maharashtra?

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune NCP | 2017 च्या प्रभाग रचनेनुसारच निवडणूक व्हाव्यात, असे भाजपाचे म्हणणे आहे. तसेच पुण्यात नव्याने सामाविष्ट करण्यात आलेली 34 गावे वगळण्याचा शिंदे-भाजप सरकारचा (Shinde-BJP Government) डाव आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) पुणे प्रशांत जगताप म्हणाले, पुणे महापालिकेसह (PMC) राज्यातील 23 महापालिकांवर मागील सात महिन्यांपासून प्रशासनाचे राज्य आहे. कुठलीही महापालिका लोकप्रतिनिधी शिवाय कारभार करू शकत नाही. असे असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) काही याचिका प्रलंबित आहेत आणि निवडणुका त्वरित घेण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.

 

प्रशांत जगताप पुढे म्हणाले की, याउलट आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी महापालिका निवडणुका (Municipal Elections) या चार सदस्य प्रभाग रचनेनुसार व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सातत्याने निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र जनतेची कामे मार्गी लागण्यासाठी निवडणुका कशाही घ्या, पण त्वरित घ्या ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे.

 

शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप करताना जगताप म्हणाले, दुर्दैवाने पुणे महापालिकेची निवडणूक
(Pune Municipal Corporation (PMC) Election) 2017 च्या प्रभाग रचनेनुसार होण्यासाठी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे नवी खेळी खेळत आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेली 34 गावे वगळण्यात यावीत म्हणजे जेणेकरून 2017 चीच
प्रभाग रचना कायम राहील यासाठी ही नवी खेळी खेळली जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिंदे-फडणवीसांना इशारा देताना जगताप म्हणाले, भाजपच्या या राजकीय खेळीला राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाम विरोध आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आम्ही ही बाब आणणार आहोत.
त्याचबरोबर रस्त्यावर देखील उतरून आम्ही लढाई करू. याची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी.

 

 

Web Title :- Pune NCP | ncp allegations on cm eknath shinde and dycm devendra fadnavis over 34 villages issue

 

हे देखील वाचा :

Myths And Facts During Pregnancy | गरोदरपणातील खाणे-पिणे आणि त्यासंबंधीत काही गैरसमज आणि त्यांचे सत्य जाणून घ्या!

Bhaskar Jadhav | नारायण राणेंविरोधात शिवराळ भाषा वापरणं भास्कर जाधवांना भोवणार?, कुडाळ पोलीस ठाण्यात FIR

Honey Benefits | हिवाळ्यात मध खूप फायदेशीर, जाणून घ्या ‘हे’ खाण्याचे 6 फायदे

 

Related Posts