IMPIMP

Pune NCP | PM नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ‘मोदी गो बॅक’ आंदोलन

by nagesh
Pune NCP | NCP's 'Modi go back' agitation on the backdrop of PM Narendra Modi's visit to Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे येत्या 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर (Pune Tour) येत आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आवारात साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे आणि पुणे मेट्रोचे (Pune Metro) लोकार्पण करणार आहेत. मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे राष्ट्रवादी काँग्रेस (Pune NCP) पक्षाकडून ‘मोदी गो बॅक’चा नारा (Modi Go Back) देण्यात आला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या महाराष्ट्रासंदर्भातील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Pune NCP) आंदोलन केले जाणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, मागील काही दिवसांपासून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नेत्यांकडून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच त्यांच्या स्वराज्य भूमी असणाऱ्या महाराष्ट्राचा वारंवार अपमान (Insult) केला जात आहे. अगदी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोरोना (Corona) काळाचा संदर्भ देत स्वराज्यभूमी महाराष्ट्राचा अपमान केला. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेमधील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा घाट पुणे भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ‘मोदी गो बॅक’ आंदोलन 6 मार्चला संपूर्ण पुणे शहरात (Pune City) करणार आहे.

 

या महाराष्ट्र द्रोही भाजप सरकारने (BJP Government) दुटप्पीपणाने
आजतागायत आपल्या भूमीला आणि जनतेला कमी लेखले आहे.
अशा पंतप्रधान मोदींच्या निषेधार्थ सर्वांनी काळे कपडे घालून, फ्लेक्स,
बॅनर लावत मोदी गो बॅक निषेध आंदोलन छेडले जाणार आहे,
अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ता व प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh) यांनी दिली.

 

 

Web Title :- Pune NCP | NCP’s ‘Modi go back’ agitation on the backdrop of PM Narendra Modi’s visit to Pune

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समितीने अखेरच्या बैठकीत 2500 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना एकमताने दिली मान्यता; नदी सुधार, नदी काठ सुधार, पीपीपी तत्वावरील रस्त्यांच्या कामांचे कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर

Pune NCP | ‘5 वर्षे तुमची सत्ता होती, तुमचे मालक गृहमंत्री होते, तेव्हा का नाही सुचलं हे शहाणपण?’ पुणे राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांना सवाल

Raj Thackeray | मनसेचा 16 वा वर्धापनदिन पुण्यात ‘या’ ठिकाणी होणार साजरा.

 

Related Posts