IMPIMP

Pune News | टपरीवर चहा पीत थांबलेल्या तरुणाचा डोक्यात झाडाची फांदी पडून मृत्यू, पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर परिसरातील घटना

by sachinsitapure
Pune Crime News

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | मागिल दोन-तीन दिवसांपासून पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. अनेक भागात गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुसान झाले आहे. दरम्यान रविवारी (दि.26) पुणे शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. झाडाखाली चहा पीत उभ्या असलेल्या तरुणाच्या डोक्यात अचानक झाडाची फांदी पडल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू (Death) झाला. अभिजित गुंड (वय-32 रा. कसबा पेठ, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी सायंकाळी घडली. अभिजित सायंकाळच्या सुमारास चहा पिण्यासाठी ओंकारेश्वर मंदिर परिसरातील टपरीवर आला होता. मित्रांसोबत चहा पित असताना अचानक झाडाची वाळलेली फांदी अभिजितच्या डोक्यात पडली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. (Pune News)

या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास विश्रामबाग पोलीस (Pune Police) करीत आहे. दरम्यान, अभिजित गुंड याच्या मृत्यूला विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाचे तसेच गार्डन विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अभिजित गुंड याच्या मित्रांनी केली आहे.

Related Posts