IMPIMP

Pune Air Pollution | प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, १२४ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस

by sachinsitapure
Pune PMC

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – दिवाळीनंतर दिल्ली, मुंबई पाठोपाठ पुण्यात हवेतील प्रदुषण (Pune Air Pollution) वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. यासाठी केंद्र व राज्य सरकारने (State Govt) नियमावली जाहीर करत धुळ निर्माण होऊ नये, हवेत उडू नये यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर स्थानिक प्रशासनाने शहरातील बांधकामांच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले होते. परंतु, या निर्देशांचे पालन ज्या बांधकाम व्यावसायिकांनी (Construction Professionals) केले नाही, अशा १२४ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. (Pune Air Pollution)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) प्रशासन अधिकाऱ्यांच्या पथकाने शहरातील विविध बांधकामाच्या साइटची वेळोवेळी पाहणी केली असता काही बांधकाम व्यावसायिकांनी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केली नसल्याचे आढळून आले. अशा १२४ बांधकाम व्यावसायिकांना काम का थांबवू नये अशी नोटीस महापालिका प्रशासनाने बजावली आहे.

पुणे शहर आणि परिसरातील हवा मोठ्या प्रमाणात प्रदुषित (Pune Air Pollution) झाली असल्याने योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) दिले आहेत.
शहरातील बांधकाम साइटवरून उडणाऱ्या धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.
२५ फुटापर्यंत पत्रे, हिरव्या ज्यूटचे कापड लावून धूळ उडण्याचे प्रमाण कमी करणे, पाणी मारणे अशा उपाय योजनांचा समावेश आहे.

पुणे शहरातील मध्यवर्ती पेठा, कोरेगाव पार्क, बाणेर बालेवाडी या भागात जास्त प्रदुषण होत आहे.
महापालिकेच्या (Pune PMC News) पथकाने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना काम का थांबवू नये, अशी नोटीस बजावली आहे.

महापालिकेने केलेल्या कारवाईबाबत माहिती देताना
अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले की, आता पर्यत बांधकाम विभागाच्या झोन क्रमांक १ मध्ये १५,
झोन क्रमांक २ मध्ये २१, झोन क्रमांक ३ मध्ये १८, झोन क्रमांक ४ मध्ये १७, झोन क्रमांक ५ मध्ये १२, झोन क्रमांक ६ मध्ये १६,
झोन क्रमांक ७ मध्ये २५ जणांना या प्रकारे १२४ बांधकाम प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Related Posts