IMPIMP

Pune News | पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळांची वर्षातून 3 वेळा तपासणी

by nagesh
Pune News | Inspection of special schools for disabled in Pune district 3 times a year

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळांची शिक्षण विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (IAS Ayush Prasad) यांनी आदेश दिले आहेत. गुणवत्तेसोबतच शाळांमध्ये चांगल्या भौतिक सुविधा पुरवल्या जात आहेत किंवा कसे, याची वर्षातून तीन वेळा तपासणी करण्यात येणार आहे. (Pune News)

 

या शाळांची वर्षांतून तीन वेळा तपासणी करण्यात येणार आहे. या शैक्षणिक वर्षांतील तपासणी याच महिन्यात केली जाणार असून दुसरी तपासणी डिसेंबर आणि पुढील वर्षाच्या जानेवारीत, तर तिसरी तपासणी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये करण्यात यावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. तपासणी अधिकाऱ्याने शाळांच्या प्रत्येक तपासणीनंतर शेरे पुस्तकांत नोंदी करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटी सुधारून पुन्हा एकदा शाळांना भेटी देण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या निकषांनुसार या शाळांमध्ये किमान ९० बाबींची पुर्तता करणे आवश्यक आहे. या तपासणीतून त्यांची सद्य:स्थिती पाहण्यात येणार आहे. त्या नसल्यास त्रुटी दूर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली जाईल. त्यानंतर मात्र, कारवाई केली जाणार आहे, असे आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सहा महिन्यांची मुदत

या शाळांमधील त्रुटी दूर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात येणार असून त्या पूर्ण न केल्यास कारवाई करण्याचा इशारा ही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.
जिल्ह्यात शारीरिक विकलांग विद्यार्थ्यांच्या ७७ विशेष शाळा आणि कर्मशाळा आहेत.
या शाळांची तपासणी करण्यासाठी केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या मार्फत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्यातील शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी कार्यक्षमता प्रतवारी निश्चित केली आहे.
त्याअनुषंगाने ही तपासणी करण्यात येणार आहे.

 

Web Title :- Pune News | Inspection of special schools for disabled in Pune district 3 times a year

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | शिंदे विरुद्ध ठाकरे सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी अनिश्चित? शिंदे-ठाकरेंची प्रकरणे लिस्टमध्ये नाहीत…

Pune Crime | बनावट कागदपत्रे तयार करुन त्यावर काढले 2 कोटींचे कर्ज; प्रॉपर्टीवर, पुण्यातील व्यावसायिकाची फसवणुक

Maharashtra Assembly Session | 8 मजली मातोश्रीच्या पायऱ्या चढताना…’, शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

 

Related Posts