IMPIMP

Pune Crime | बनावट कागदपत्रे तयार करुन त्यावर काढले 2 कोटींचे कर्ज; प्रॉपर्टीवर, पुण्यातील व्यावसायिकाची फसवणुक

by nagesh
Pune Crime News | Fraud of youth on official toll free number of finance company; 7.5 lakhs cheated by asking to generate a new credit card PIN

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | घोरपडी येथील (Ghorpadi In Pune) उच्चभ्रू परिसरातील दोन बंगले खरेदी करायचा बहाणा करुन
त्याची कागदपत्रे घेऊन त्यांची परस्पर विक्री केली. तसेच त्यावर २ कोटी रुपयांचे कर्ज काढले (Cheating Case). प्रॉपर्टीवर व वीज बिलावर नाव लावून
व्यावसायिकाची फसवणुक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी व्यावसायिक संजय मुरलीधर बजाज Sanjay Muralidhar Bajaj (वय ६२, रा. उदयबाग, घोरपडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३४८/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गजेंद्र भिकमचंद संचेती, गीतेश गजेंद्र संचेती, सुनिल भुजबळ, जितेंद्र रामनुज जस्वाल आणि त्रेजा रामचंद्र गिल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीचे २ बंगले आहेत हे बंगले खरेदी करण्याची संचेती व इतरांनी बतावणी करुन कर्ज प्रकरणाची चौकशी करायची आहे, असे सांगून त्यांच्याकडून मालमत्तेची कागदपत्रे घेतली.
बनावट सह्या करुन तसेच त्यांच्या आधार कार्ड व पॅन कार्डमध्ये छेडछाड करुन त्याद्वारे परस्पर बनावट दस्त तयार केले.
फिर्यादी यांच्या ऐवजी तोतया व्यक्तीला उभे केले. त्यांची मालमत्ता परस्पर बेकायदेशीररित्या विक्री केली.
त्यांच्या कागदपत्रांचा वापर करुन बनावट बँक खाते उघडून मुंबईतील बँकेकडून २ कोटी रुपयांचे कर्ज घेतले.
तसेच त्यांच्या मालमत्तेवर व वीज बिलावर स्वत:ची नावे लावून फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक माया गावडे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | 2 Crore loan by creating forged documents Fraud of businessman in Pune on property

 

हे देखील वाचा :

Maharashtra Assembly Session | 8 मजली मातोश्रीच्या पायऱ्या चढताना…’, शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Maharashtra Assembly Session | ‘पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर’, ‘युवराजांची ‘दिशा’ नेहमीच चुकली’; आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या निशाण्यावर

Pune Crime | ससूनमधील डॉक्टरांच्या नावाने रुग्णांच्या नातेवाईकांकडे पैसे मागण्याचा प्रकार

 

Related Posts