IMPIMP

Pune News | पुण्यातील नगररोड परिसरात डेंग्यूचा उद्रेक, अनेकांना डेंग्यू सदृश्य ताप

by nagesh
Pune News | Outbreak of dengue in Nagar Road area of Pune, dengue-like fever to manyPune News

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  पुण्यातील (Pune News) नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या (Nagar Road Regional Office) हद्दीत डेंग्यूचा (Dengue) उद्रेक झाला आहे. या भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. पावसाचे पाणी (Rain water) रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक कप अडगळीच्या साहित्यामध्ये साठून राहणारे पाणी, यामुळे या भागात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या (Pune News) हद्दीमध्ये 13 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर 133 जणांना डेंग्यू सदृश्य ताप आल्याचे निदर्शनास आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

अनेकांमध्ये डेंग्यूची लक्षणे

सध्या पावसाचे दिवस असल्याने पुणे आणि परिसरात पाऊस पडत आहे. पावसाचे पाणी रिकाम्या बटल्या, बॅरल, कुंड्या तसेच प्लास्टिक वस्तू, फ्रिज खालील ट्रे, फुलदाणी, कुलर, घराच्या छतावरील अडगळीच्या साहित्यात साचून राहेत. यामुळे डासांची उत्पती होत आहे. अनेकांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आली आहेत. तर काही जणांना डेंग्यू सदृश्य तापाने (Dengue fever) ग्रासल्याने रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे.

डेंग्युची लक्षणे

सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, थकवा, भूक मंदावणे, मळमळ, पोटदुखी अशी लक्षणे रुग्णांमध्या आढळून येत आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिका प्रशासनाने या भागात फवारणी केली आहे. याशिवाय या बाबत उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पालिकेकडून लोकांना घराचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत प्रबोधन करण्यात (Pune News) येत आहे, असे पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) सहायक आरोग्य अधिकारी संजीव वावरे (Assistant Health Officer Sanjeev Wavre) यांनी सांगितले.

 

Web Title : Pune News | Outbreak of dengue in Nagar Road area of Pune, dengue-like fever to manyPune News

 

हे देखील वाचा :

Palghar Minor Girl Murder | खळबळजनक ! दुकानात गेलेल्या 8 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याचे विकृत कृत्य, मान कापलेल्या अवस्थेत आढळली चिमुकली

Supreme Court | बिल्डरांना सुप्रीम कोर्टाचा दणका ! आता घर खरेदीदारांची फसवणूक थांबणार; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यात ‘ते’ होर्डिंग लावणाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

 

Related Posts