IMPIMP

Pune Crime | पुण्यात ‘ते’ होर्डिंग लावणाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Mangesh Kanchan arrested by Loni Kalbhor police for threatening two doctors and demanding Rs 30 lakh ransom

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | कात्रज चौकाजवळ जुन्या रस्त्यावर कात्रजचा खून झाला (Murder of Katraj) अशा आशयाचे विचित्र होर्डिंग उभारण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारी दिवसभर याचीच चर्चा शहरात रंगली होती. तर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे होर्डिंग कोणी लावले हे मात्र स्पष्ट झाले नसले तरी भारती विद्यापीठ पोलीस (bharati vidyapeeth police) ठाण्यात हे होर्डिंग लावणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हनुमंत तुकाराम लोणकर ( रा.कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

कात्रज चौकाजवळ जुन्या रस्त्यावर हे होर्डिंग उभारण्यात आले असून त्यावर रक्ताने माखलेला चाकूचे चित्र असलेला आणि त्यावर कात्रजचा खुन झाला असा विचित्र मजकुर लिहिला होता.
त्यामुळे पुण्यात या होर्डिंगचीच चर्चा दिवसभर सुरु होती.
हे होर्डिंग कोणी लावले हे समोर आले नसले तरी उलट सुलट चर्चेला ऊत आला होता.
होर्डिंग लावण्याची परवानगीही घेतली नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरणही पसरले होते.
भारती विद्यापीठ पोलिसांकडुनही या प्रकरणचा तपास सुरु होता.
अखेर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्यावतीने फिर्याद देण्यात आली.
त्यानुसार अनोळखी व्यक्तिविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याच्या कायद्यानुसार गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title : Pune Crime | finally filed case against who hold flex in katraj chow as a murder of katraj bharati vidyapeeth police station

 

हे देखील वाचा :

Manohar Mama Bhosale | अबब ! मनोहरमामा भोसले यांच्या बँक अकाऊंटमध्ये ‘इतके’ लाख रुपये कुठून आले?

Solapur Crime | धक्कादायक ! पतीच्या निधनानंतर पत्नीचीही रेल्वेखाली आत्महत्या; प्रचंड खळबळ

 

Related Posts