IMPIMP

Supreme Court | बिल्डरांना सुप्रीम कोर्टाचा दणका ! आता घर खरेदीदारांची फसवणूक थांबणार; जाणून घ्या

by nagesh
Supreme Court | army not being fair to women officers says supreme court in hearing on women officers pil regarding promotion

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Supreme Court | अनेकजण आपले हक्काचे घर खरेदी करण्याचे स्वप्न (Dream house) पाहत असतात. घर खरेदी करण्यापूर्वी बिल्डर्स (Builders) खरेदीदारांना अनेक स्वप्न दाखवतात मात्र, प्रत्यक्षात त्यांना सांगितलेल्या सुविधा (Convenience) दिल्या जात नाहीत. त्यामुळे आयुष्यभर कष्ट करुन जमवलेला पैसा खर्च करुन देखील त्यांना आपले हक्काचे स्वप्नातील घर मिळत नाही. त्यातच बिल्डरने आधिच पैसे घेतल्याने त्यांना दुसरा पर्याय उरत नाही. परंतु आता घर खरेदी करताना आर्थिक फसवणूक (Financial fraud) टाळली जाणार आहे. देशभरातील कोट्यावधी घर खरेदीदारांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिलेल्या आदेशामुळे बिल्डरांना मोठा दणका बसणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सुप्रीम कोर्टात (Supreme Court) एका प्रकरणावर सुनावणी करताना कोर्टाने महत्त्वाचा निर्णय (important decision) दिला आहे. ठरल्याप्रमाणे सुविधा उपलबध करुन दिल्या नाही आणि अपूर्ण प्रकल्पाचा ताबा ग्राहकांना दिल्यास बांधकाम व्यावसायिकांना भरपाई द्यावी लागेल. बिल्डरांनी खरेदीदारांना दिलेलं प्रत्येक वचन पूर्ण करावे लागेल, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

 

नुकसान भरपाई द्यावी लागेल
याबाबत सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांशिवाय फ्लॅट वितरित करणे किंवा खरेदीदारांना आश्वासन दिल्याप्रमाणे सुविधा न दिल्यास प्रकल्प अपूर्ण राहिल्यास बिल्डरांना RWA ला नुकसान भरपाई द्यावी लागले.

 

 

काय आहे प्रकरण ?

दिल्लीजवळ असणाऱ्या गौतम बुद्ध नगर (Noida) येथील एका प्रकल्पासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती.
येथील बिल्डर पद्मिनी इन्फ्रस्ट्रक्चरने (Padmini Infrastructure) 18 वर्षांपूर्वी घर खऱेदीदारांना वॉटर सॉफ्टनिंग प्लांट (Water softening plant),
हेल्थ कल्ब, स्विमिंग पूल (Swimming pool) आणि अग्निशमन यंत्रणा इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे वचन दिले होते.
मात्र, संबंधित बिल्डरने ग्राहकांची फसवणूक करुन कोणतीही सुविधा उपलब्ध करुन न देता फ्लॅटची विक्री केली.
या प्रकरणात मागील काही वर्षापासून सुरु असलेल्या सुनावणीनंतर, अखेर सुप्रीम कोर्टाने न्याय दिला आहे. तर दोषी बिल्डरला 60 लाख रुपये दंड ठोठावला आहे.

 

Web Title :- Supreme Court | supreme court decision against builders now fraud with home buyers will stop, know about case

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात ‘ते’ होर्डिंग लावणाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

Manohar Mama Bhosale | अबब ! मनोहरमामा भोसले यांच्या बँक अकाऊंटमध्ये ‘इतके’ लाख रुपये कुठून आले?

Pune News | खुशखबर ! मुंबईच्या धर्तीवर पुणे, पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना मिळणार 300 चौरस फुटांची घरे

 

Related Posts