IMPIMP

Pune News | निळूभाऊ फुले, शंकरराव खरात यांच्या नावाने पुरस्कार सुरू करा

by nagesh
Pune News | Start the award in the name of Nilubhau Phule, Shankarrao Kharat

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune News | पुण्याचे सुपुत्र असलेले निळूभाऊ फुले (nilu phule) यांनी त्यांच्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांनी समाजकल्याणासाठी अनेक कामे केली तसेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही ते सातत्याने प्रयत्नशील (Pune News) होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे कादंबरीकार व इतिहासकार शंकरराव खरात (shankarrao kharat) हे आंबेडकरी चळवळतील प्रमुख लेखक होते.
पुण्यात त्यांचे वास्तव्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत त्यांनी काम केले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे (dr. babasaheb ambedkar marathwada university) कुलगुरू म्हणून त्यांनी उत्तम कामकाज पहिले.
त्यामुळे पुणे महानगर पालिकेमार्फत (Pune Corporation) प्रतीवर्षी एखाद्या कलावंताला निळूभाऊ फुले यांच्या नावाने तसेच साहित्य क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या व्यक्तिला प्रतीवर्षी शंकरराव खरात यांच्या नावाने पुरस्कार देण्यात यावा.
अशी विनंती आज महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांना केली.

विविध क्षेत्रातील संस्था, संघटना पुरस्कार देतात पण पुणे महानगरपालिकेमार्फत दिला जाणारा पुरस्कार हा पुणे पुणेकरांच्यावतीने अधिकृत रित्या समजला जातो.
त्यामुळे पुणे महानगरपालिकेमार्फत हा पुरस्कार सुरू करावा ही विनंती भाजपचे सुनिल माने (BJP Sunil Mane) यांनी केली आहे.
त्याचा पाठपुरावा देखील करणार असल्याचे माने यांनी सांगितले आहे.

 

Web Title : Pune News | Start the award in the name of Nilubhau Phule, Shankarrao Kharat

 

हे देखील वाचा :

Pune Navratri 2021 | पुण्यात नवरात्रोत्सवात दांडीया, गरबा आणि मिरवणुकीला परवानगी नाही; पालिका आयुक्तांचे आदेश

HeartBurn | छातीत जळजळीच्या 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, कॅन्सर-हार्ट अटॅकचे असू शकतात संकेत, जाणून घ्या

FSSAI Recruitment 2021 | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये 255 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Related Posts