IMPIMP

Pune News | बालेवाडी भागातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद ! लहू बालवडकर सोशल वेलफेअरने पार केला 2500 लसीकरणाचा टप्पा

by bali123
Pune News | The overwhelming response of the citizens of Balewadi area! Lahu Balwadkar Social Welfare has crossed the 2500 vaccination stage

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | शंभर कोटी कोरोना लसीकरणाचा टप्पा भारताने पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी डिसेंबरपूर्वी भारतीय नागरिकांचे शंभर कोटी लसीकरणाचे डोस पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला होता, परंतु ऑक्टोबर महिन्यामध्येच हे ध्येय पूर्ण झाले आहे. पुणे शहरात देखील 55 लाखांच्यावर लसीकरण डोस देण्यात आले आहेत. सरकारी केंद्रासोबतच खासगी केंद्रांनी देखील यामध्ये मोठे योगदान दिले आहे. यामधील एक म्हणजे लहू बालवडकर (lahu balwadkar) सोशल वेलफेअर.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

भाजप सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते असणारे लहू बालवडकर (lahu balwadkar) हे बाळासाहेब देवरास पॉलिक्लिनिक, सिरम इन्स्टिटयूट, PPCR, पुणे वैद्यकीय सेवा प्रतिष्ठान, फर्स्ट एड पॉलिक्लिनिक आणि सोशल वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या कार्यालयात लसीकरण केंद्र (Pune News) चालवत आहेत. या लसीकरण केंद्राने देखील २५०० लसीकऱणाचा टप्पा पुर्ण केला आहे.

 

 

 

देशामध्ये जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम देखील जोरदार सुरू आहे. त्यामुळे भारताने कोरोना लसीचा १०० कोटी डोसचा टप्पा पार करून जगभरात इतिहास रचला आहे. देशातील १०० कोटीचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकार दोन पाय घट्ट करून मैदानात उभे असतानाच भाजप सदस्य आणि समाजिक कार्यकर्ते लहु बालवडकर यांच्या सोशल वेलफेअरच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने आज २५०० लसीकरणाचा टप्पा पार करत सरकारच्या मोहीतमेत (Pune News) भर घातली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सामाजिक कार्यकर्ते लहु बालवडकर हे सोशल वेलफेअरच्या माध्यमातून संकटकालीन परिस्थितीत गरिब
आणि गरजू नागरिकांना नेहमीच मदतीचा हात देत असतात. त्यामध्ये आरोग्य, अन्नधान्य यांसह आर्थिक समस्यांनाही हातभार लावतात.
त्यातच एकीकडे केंद्रातील भाजप सरकार १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पुर्ण करत असतानाच लहु बालवडकर यांनी बाणेर, बालेवाडी,
सुस आणि म्हाळुंगे परिसरातील २५०० नागरिकांचे लसीकरण करून एक नवा आदर्श ठेवला आहे.
त्यामुळे बालवडकर यांच्या लसीकरण मोहीमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, या लसीकरण मोहिमेत मोलाची साथ देणाऱ्या नर्सेस व इतर आरोग्य कर्मचारी यांचा लहु गजानन बालवडकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी या मोफत लसीकरण मोहिमेत बाणेर, बालेवाडी ,सुस,
म्हाळुंगे येथील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व आपल्या देशाला,
आपल्या शहरला, आपल्या परिसराला कोरोना महामारीमुक्त करावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,
अशी भावना भाजपा सदस्य व लसीकरण मोहिमेचे आयोजक लहु बालवडकर यांनी व्यक्त केली.

 

Web Title : Pune News | The overwhelming response of the citizens of Balewadi area! Lahu Balwadkar Social Welfare has crossed the 2500 vaccination stage

 

हे देखील वाचा :

Related Posts