IMPIMP

Pune News | शुक्रवार पेठेतील जुन्या वाड्याचा जिना, भिंतीचा काही भाग कोसळला; अग्निशमन दलाने अडकलेल्या 6 रहिवाशांंची केली सुटका

by nagesh
Pune News | The stairs of the old wada in shukrawar peth pune on Friday part of the wall collapsed Firefighters rescue 6 stranded residents

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune News | रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे अधिक कमकुवत झालेल्या शुक्रवार पेठेतील (Shukrawar Peth, Pune) नेहरु चौक येथे असलेल्या कारंडे वाड्यातील (Old Wada) जिना व भिंतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे त्यात वरच्या मजल्यावर अडकून पडलेल्या ६ जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. ही घटना शनिवारी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी घडली. (Pune News)

 

याबाबत अग्निशमन दलाने (Pune Fire Brigade) सांगितले की, शुक्रवार पेठेतील नेहरु चौकात कारंडे हा सुमारे ८० वर्षापूर्वीचा वाडा आहे.
माती व विटांचे बांधकाम असलेला हा २ मजली वाडा आहे.
आज सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी वाड्याचा जिना कोसळला असून त्यात काही जण अडकल्याची माहिती मिळाली.
अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी पोहचली. (Pune News)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या तळमजला अधिक २ मजले असलेल्या वाड्याचा जिना व लगतची भिंत कोसळली होती.
त्यात वरच्या मजल्यावर ६ जण अडकून पडले होते.
अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेल्या जिन्याच्या काही भागावरील विटा, माती बाजूला करुन रस्ता तयार केला.
त्यानंतर शिडीचा वापर करुन या ६ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांची सुटका केली.
त्यात उमा जन्नू (वय ५५), गोपाळ जन्नू (वय ७०), किरण जन्नू (वय ३५), शोभा सातपुते (वय ६४), गंगु बोबडे (वय ३०)
आणि विकास बोबडे (वय २८) यांची सुटका करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune News | The stairs of the old wada in shukrawar peth pune on Friday part of the wall collapsed Firefighters rescue 6 stranded residents

 

हे देखील वाचा :

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला; म्हणाले – “तर लगेच त्यांची आमदारकी रद्द होईल, कोर्टातही जावं लागणार नाही”

Cloudburst Near Amarnath Cave | अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना; 15 जणांचा मृत्यू, 40 जण बेपत्ता

Maharashtra OBC Political Reservation | ‘ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच’

 

Related Posts