IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पोलिसांना पैसे देण्याच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक, कोंढवा परिसरातील प्रकार

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे (Economic Offences Wing (EOW) दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतील असे सांगून एका महिलेच्या पतीकडून 20 लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) दोन जणांवर फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी 2023 ते 4 एप्रिल 2023 या कालावधीत ब्रह्मा ईस्टेट येथील आरोपीच्या कार्यालयात तसेच कोंढवा परिसरातील कौसरबाग मस्जिद हॉल (Kausarbagh Masjid Hall) येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत कोंढवा खु. येथील एनआयबीएम रोड येथे राहणाऱ्या 41 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) बुधवारी (दि.3) फिर्याद दिली आहे. यावरून ईक्बाल इब्राहीम शेख (रा. नईम सोसायटी, कौसरबाग, कोंढवा खु.), साजीद बासीत शेख (रा. भाग्योदय नगर, रौनक बिल्डींग, कोंढवा खु.) यांच्यावर आयपीसी 406, 420, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती परवेज दुल्ला खान यांच्या विरुद्ध पुणे आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार
अर्ज दाखल आहे. दाखल तक्रार अर्जाच्या चौकशीत फिर्यादी यांच्या पतीला पोलिसांकडून अटक होऊ नये यासाठी
आरोपींनी मध्यस्थी करण्याचे आश्वासन देऊन फिर्यादी यांच्या पतीचा विश्वास संपादन केला.
आरोपींनी पोलिसांना पैसे द्यावे लागतील असे सांगून फिर्यादी यांच्या पतीकडून वेळोवेळी 20 लाख रुपये घेतले.
मात्र, फिर्यादी यांच्या पतीवर गुन्हा (FIR) दाखल झाल्याने फिर्यादी यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली.
त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना पैसे परत न करता शिवीगाळ करुन धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले (PI Sandeep Bhosale) करीत आहेत.

Related Posts