IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | …म्हणून अल्पवयीन मुलीचा खून केला, नराधम बापाला पुणे गुन्हे शाखेकडून अटक

by sachinsitapure
Pune Police Crime Branch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | ऊस तोडण्याच्या कोयत्याने पोटच्या मुलीवर सपासप वार करुन खून केल्याची (Pune Minor Girl Murder) खळबळजनक घटना बुधवारी (दि.3) वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे घडली होती. खून करुन पळून गेलेल्या नराधम बापाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहा च्या (Pune Police Crime Branch Unit 6) पथकाने हडपसर येथील गाडीतळ येथून अटक केली. मुलीचा खून केल्यानंतर आरोपी सोलापूरला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अक्षदा फकीरा दुपारगुडे असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. ती इयत्ता 10 मध्ये शिकत होती. पोलिसांनी फकीरा गुंडा दुपारगुडे (वय45 रा. नगर रोड जवळ, वाघोली) याला अटक (Arrest) केली आहे. खुनाची घटना घडल्यानंतर युनिट सहा चे पोलीस पथक तपास करत असताना आरोपी फकीरा दुपारगुडे हा गाडीतळ, हडपसर येथे थांबला असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने हडपसर भागात पुणे-सोलापूर रोडवर (Pune-Solapur Road) आरोपीचा शोध घेतला. आरोपी घाई-गडबडीत बसमधून सोलापूरकडे जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

म्हणून केला खून…

पोलिसांनी आरोपी फकीरा दुपारगुडे याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले, घरामध्ये त्याची पत्नी व मुलगा
तसेच मुलगी यांच्यात मी काहीही काम करत नाही, पैसे कमवत नाही दारु पितो यावरुन वाद-विवाद होत होते.
त्यामुळे सततच्या भांडणाला कंटाळून बुधवारी सकाळी मुलगा व पत्नी घरात नसताना मुलगी अक्षदा हिच्यासोबत
दारु पिण्यावरुन वाद झाल्याने घरातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने सपासप वार करुन खून केल्याचे सांगितले. पुढील कार्यवाहीसाठी आरोपीला लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार)
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे
(DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम (PI Ulhas Kadam), पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके
(PSI Bhairavanath Shelke), पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंडे, प्रतिक लाहीगुडे,
सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, ज्योती काळे यांच्या पथकाने केली.

Related Posts