IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | कोर्टातील लिलावातील सोने स्वस्तात देण्याच्या नावाखाली वकिलाने घातला गंडा

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | कोर्टाने जप्त केलेले सोने लिलावात (Gold Auction) स्वस्तात मिळवून देण्याच्या नावाखाली एका व्यावसायिकाची १५ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी (Pune Rural Police) एका वकिलाविरुद्ध (Advocate) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सनी अजित बलदोटा Sunny Ajit Baldota (रा. गजानन सोसायटी, दौंड) असे या वकिलाचे नाव आहे.

याबाबत दौंडमधील एका फोटोग्राफरने दौंड पोलीस ठाण्यात (Daund Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२६७/२३) दिली आहे. स्वस्तात सोने मिळत असल्याचे पाहून त्यांनी कर्ज काढून पैसे दिले. पण आता पैसे गेलेच त्याबरोबर कर्जाचे हप्ते, व्याज भरण्याची वेळ फिर्यादीवर आली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा स्टुडिओ आहे. त्यांच्याकडे अ‍ॅड. सनी बलदोटा हे फोटो काढण्यासाठी आले असताना ओळख झाली. अडचणीच्या काळात ते एकमेकांना आर्थिक मदत करत होते. वेळेत व्यवहार पूर्ण होत असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती. जूनमध्ये सनी बलदोटा फिर्यादीकडे आले व दौंड कोर्टामध्ये (Daund Court) जप्त केलेल्या सोन्याचा लिलाव होणार आहे, माझे कोर्टामधील न्यायाधीशांशी चांगले संबंध असून माझे त्यांचेशी चांगले सेटिंग आहे. मी बर्‍याच लोकांना सोने, गाड्या तसेच इतर वस्तु स्वस्तात मिळवून दिल्या आहेत. या लिलावामधील २५ हजार रुपये दराप्रमाणे ६० तोळे सोने स्वस्तात मिळवून देतो, तुम्ही १५ लाख रुपयांची तजवीज करुन ठेवा. लिलाव झालेली रितसर पावती तुम्हाला कोर्टामधून मिळवून देतो, तुम्हाला काही कायदेशीर अडचण येणार नाही, असे सांगितले.

बलदोटा वकील असल्याने फिर्यादी यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना १५ लाख रुपये दिले.
त्यासाठी अडीच लाख रुपयांचे कर्ज काढले.
काही दिवसांनी फिर्यादी यांनी बलदोटा यांनी सोने खरेदीविषयी विचारल्यावर त्यांनी अजून लिलाव झाला नाही,
लवकरच होईल, असे सांगून वेळ मारुन नेऊ लागले. जास्त दिवस झाल्याने फिर्यादी यांना शंका आली.
त्यांनी लिलावाबाबत चौकशी केली असता कोर्टामध्ये अशा प्रकारचा कोणताही लिलाव होत नाही.
त्यानंतर त्यांनी सनी बलदोटा याची भेट देऊन असा कोणताही लिलाव होत नाही तरी तुम्ही माझी सर्व रक्कम परत द्या
नाही तर मी तुमच्या विरोधात पोलिसांत तक्रार करेल, असे सांगितले.
त्यावर त्यांनी आपल्या आईच्या नावाच्या खात्याचा चेक दिला. फिर्यादी यांनी बँकेत जाऊन चेक दाखविला असता
त्या खात्यामध्ये रक्कम नसल्याचे आढळून आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

Related Posts