IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | कोंढवा पोलिसांकडून 7 पिस्तुलांसह 24 काडतुसे जप्त, 3 सराईत आरोपींना अटक

by sachinsitapure
Kondhwa Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | विनापरवाना पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या दोघांना व पिस्टलची विक्री करणाऱ्या आरोपीच्या हस्तकाला कोंढवा पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अटक (Arrest) केलेल्या आरोपींकडून 7 पिस्टल व 24 काडतुसे (Cartridges) असा एकूण 3 लाख 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने हि कारवाई बोपदेव घाटाच्या (Bopdev Ghat) पायथ्याला असलेल्या हॉटेल जवळ आणि जळगाव तालुक्यातील चोपडा येथे केली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

संदेश उर्फ संजय अंकुश जाधव (वय- 32 रा. गोकुळ हौसींग सोसायटी, मोरे वस्ती, चिखली), शिवाजी उर्फ शिवा भाऊ कुडेकर (वय-34 रा. मु.पो. वाशेरे, ता. खेड, जि. पुणे), राहुल नानसिंग लिंगवाले यांना अटक केली आहे. तर पिस्टल विक्री करणारा ओमंकार बर्नाला (रा. गाव उमरटी, ता. वरला. जि. बडवाणी मध्यप्रदेश) हा फरार झाला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी कोंम्बिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील आरोपी तपासत असताना पोलीस अंमलदार विशाल मेमाणे यांना माहिती मिळाली की, बोपदेव घाटाच्या पायथ्याला असलेल्या एका हॉटेलमध्ये दोन जण काही दिवसांपासून येत असून ते गुन्हेगार आहेत. ते कमरेला पिस्टल लावून फिरत असतात. त्यानुसार पथकाने 14 डिसेंबर रोजी वेशांतर करुन सापळा रचला. आरोपी रात्री पावणे आठच्या सुमारास हॉटेलमध्ये आले. आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागताच ते अंधारात पळून जाऊ लागले. त्यावेळी पथकाने दोघांचा पाठलाग करुन पकडले.

आरोपींची अंगझडती घेतली असता दोघांकडे पिस्टल व पाच काडतुसे मिळाली. आरोपी संजय जाधव याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हे दाखल असल्याने स्वसंरक्षणासाठी पिस्तुल बाळगल्याचे सांगितले. त्याच्यावर चिखली (Chikhli police station), देहूरोड (Dehu Road Police Station), वडगाव मावळ (Vadgaon Maval Police Station), निगडी (Nigdi Police Station), भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी, वाहन चोरी, विनापरवाना शस्त्र बाळगणे असे 32 गुन्हे दाखल आहेत. तर शिवा कुडेकर याच्यावर खेड पोलीस ठाण्यात (Khed police station) खुन, जबरी चोरी, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे तीन गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी शिवा कुडेकर याच्या घराची झडती घेतली त्यावेळी त्याने घरात लपवून ठेवलेले आणखी तीन पिस्टल व 9
काडतुसे जप्त केली. पिस्टल बाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे पिस्टल महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील
वरला तालुक्यातील उमरटी येथील ओमंकार बर्नाला याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पथकाने आरोपींच्या मार्फत त्याला संपर्क करुन पिस्टलची मागणी केली. त्यावेळी त्याने जळगाव तालुक्यातील चोपडा येथे पिस्टल देतो असे सांगितले. त्यानुसार पथकाने चोपडा येथील एका हॉटेलजवळ सापळा रचला बर्नाला त्याचा हस्तक राहुल लिंगवाले याच्यासह त्याठिकाणी आला. लिंगवाले याला आरोपींना पिस्टल देताना रंगेहाथ पकडून दोन पिस्टल आणि 10 काडतुसे जप्त केली. दरम्यान बर्नाला दुचाकीवरुन पळून गेला. या कारवाईत पोलिसांनी 7 पिस्टल व 24 काडतुसे जप्त केली आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा
(IPS Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 आर राजा (DCP R Raja),
सहायक पोलीस आयुक्त शाहुराव साळवे (ACP Shahuraje Salve), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे
(Senior PI Santosh Sonwane), पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले (PI Sandeep Bhosale),
पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (PI Sanjay Mogle), यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी
शिंदे (API Lekhaji Shinde), सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील (API Dinesh Patil)
पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, लवेश शिंदे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर,
संतोष बनसुडे, सुजित मदन,
ज्ञानेश्वर भोसले, सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली.

Related Posts