IMPIMP

Goldman Sagar Sapke | पुणेनंतर जळगावचा ‘गोल्डमॅन’ चर्चेत, दीड किलो सुवर्णभार पेलतात सागर सपके

by sachinsitapure
Goldman Sagar Sapke

जळगाव : Goldman Sagar Sapke | पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे (Goldman Dutta Balloons) तसेच पहिले गोल्डमॅन आणि आमदार रमेश वांजळे (Goldman Ramesh Wanjale) यांची नेहमीच चर्चा होत असते. आता अंगावर दिड किलो सुवर्णभार पेलणारे सुवर्णनगरी जळगावचे गोल्डमॅन सागर मोतीलाल सपके (Goldman Sagar Sapke) चर्चेत आले आहेत.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे यांचा सोन्याचा शर्टही चांगलाच गाजला होता. जगातला सर्वात महागडा शर्ट घालणारी व्यक्ती म्हणून फुगे यांची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. सोन्याची बटणे, सोन्याची फुले, गळ्यात सोन्याची चेन, कडे असा त्यांचा पोषाख होता.

तत्पूर्वी, पुण्यातील पहिले गोल्डन मॅन म्हणून मनसेचे माजी आमदार रमेश वांजळे यांचे नाव घेतले जाते. आता या यादीत जळगावच्या सपकेंचे नाव आले आहे. सध्या जळगावकर गोल्डमॅन म्हणून ते चर्चेत आहेत.

सागर सपके (Goldman Sagar Sapke) यांच्या अंगावर अर्धा किलोचा गोफ, ९ तोळ्याच्या अंगठ्या, ३३ तोळ्यांचे ब्रेसलेट,
१० तोळ्याची चेन, असा दीड किलो सुवर्णभार असतो. सागर या सुवर्णभाराबाबत सांगतात की, सोन्याच्या वजनामुळे
कधी-कधी चक्करही येते, रक्तदाबही वाढतो.

सागर सपके सांगतात की, ‘आई राधाबाई सपके यांच्या अंगावरही अर्धा किलो सोन्याचे दागिने असायचे.
म्हणूनच मलाही सोने घालण्याची हौस वाटू लागली. ५ हजार रुपये प्रति तोळा असतानापासूनच मी सोने घालण्यास
सुरुवात केली’.

Related Posts