IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवड : सोन्याच्या खूनाबाबत धक्कादायक माहिती आली समोर, मित्र सोन्या पानसरेने केला सोन्या तापकीरचा ‘गेम’, पोलिसांनी सांगितलं…

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime News | Krishna alias Sonya Haribhau Tapkir Murder Case Saurabh alias Sonya Pansare Chikhali Police Station

पिंपरीः सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली चौकात आज (सोमवार) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास युवकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे (Firing In Pimpri). त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र, आत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे मयताच्या मित्रानेच मित्राची ‘गेम’ केली आहे (Murder In Pimpri). खूनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर Krishna alias Sonya Haribhau Tapkir (30, रा. महादेव मंदिराजवळ, चिखलीगाव, पुणे Chikhaligaon Pune) असे खून झालेल्याचे नाव आहे. चिखली पोलिस स्टेशनमधील (Chikhali Police Station) पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या तापकीरचा खून त्याचा मित्र सौरभ उर्फ सोन्या पानसरे Saurabh alias Sonya Pansare (रा. मु.पो. मोई, ता. खेड, जि. पुणे Khed Pune) आणि त्याचा साथीदार सिध्दार्थ कांबळे (Siddharth Kamble) यांनी केला आहे. पानसरे आणि कांबळेने आज दुपारी पावणे दोन वाजता कोणत्यातरी अज्ञान कारणावरून सोन्या तापकीरची भर चौकात गोळ्या घालून गेम केली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी चिखली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
मात्र, सोन्या तापकीरची गेम सोन्या पानसरेने वाजविल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
अद्यापही खूनाचे नेमके कारण समोर आलेले नाही.
चिखली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर (Sir PI Dnyaneshwar Katkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलिस आणि पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखेचे पोलिस (Pimpri Chinchwad Police Crime Branch) आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title : Pune Pimpri Chinchwad Crime News | Krishna alias Sonya Haribhau Tapkir Murder Case
Saurabh alias Sonya Pansare Chikhali Police Station

Related Posts