IMPIMP

Pune News | मित्रांसोबत फिरायला गेलेल्या आयटी अभियंत्याचा मुळशीमध्ये बंधाऱ्यात बुडून मृत्यू

by sachinsitapure
Pune News | it engineer died after drowning in dam in mulshi

हिंजवडी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | मित्रांसोबत फिरायला गेलेल्या आयटी अभियंत्याचा (IT Engineer) बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Drowning in Dam) झाला आहे. ही दुर्घटना मंगळवारी (दि.15 ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास रिहे (मुळशी-Mulshi) गावच्या हद्दीत घडली आहे. हर्षित पोटलुरी Harshit Potluri (वय-27) असे मृत्यू झालेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे. हर्षित हा मुळचा आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) राजमुन्ड्री (Rajahmundry) येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हर्षित हा काही महिन्यांपासून हिंजवडी येथे राहत होता. तो हिंजवडी आयटी पार्क फेज तीन (Hinjewadi IT Park Phase Three) मधील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करत असल्याचे समजतेय. (Pune News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

स्वातंत्र्य दिनाची सुट्टी (Independence Day Holiday) असल्याने हर्षित आपल्या दोन मित्रांसोबत हिरे बंधारा परिसरात फिरण्यासाठी गेला होता. बंधाऱ्यात पोहायला उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो बंधाऱ्याच्या पाण्यात बुडाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रिहे गावचे उपसरपंच काकासाहेब शिंदे, पोलीस पाटील नंदकुमार मिंडे, सामाजिक कार्यकर्ते केशव पडघळे यांच्यासह ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने पौड पोलीस स्टेशन (Paud Police Station), अग्निशमन दल (Fire Brigade) आणि मुळशी आपत्कालीन पथकाचे (Mulshi Emergency Squad) प्रमोद बलकवडे यांना माहिती दिली. (Pune News)

साधारणत: तीन तासानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
परंतु हिंजवडी आयटी पार्क पासून अवघ्या 25-30 मिनिटांच्या अंतरावर ही घटना घडली असून,
मदतीसाठी घटनास्थळी पोहचण्यासाठी यंत्रणांना दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुढील तपास पौढ पोलीस करीत आहेत.

 

Related Posts