IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | रेल्वे प्लॉटफॉर्मवर गर्दीच्याच नव्हे तर पहाटेही होतेय मोबाईल चोर्‍या; १ लाख ३५ हजारांचा मोबाईल पहाटे साडेचारला लांबविला, आजची घटना

by sachinsitapure
Pune Railway Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | एस टी, पीएमपी बसमध्ये चढताना मोबाईल, गळ्यातील दागिने (Jewelry) चोरुन नेण्याचे प्रकार वारंवार घडताना दिसून येतात. आता हे लोण पुणे रेल्वे स्टेशनवरही (Pune Railway Station) पसरले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वे प्लॉटफॉर्मला लागल्यानंतर त्यात चढण्यासाठी होत असलेल्या गर्दीत चोरटे हात साफ करुन घेऊ लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकार वाढले असून आज तर पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एका व्यापार्‍याचा १ लाख ३५ हजार रुपयांचा मोबाईल चोरट्याने लांबविला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत पिंपरी येथील एका ३३ वर्षाच्या व्यापार्‍याने पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात (Pune Lohmarg Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८५३/२३) दिली आहे. फिर्यादी हे पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॉटफॉर्म नंबर ४वर आले होते. निजामुद्दीन एक्सप्रेस प्लॉटफॉर्मवर (Nizamuddin Express Platform) आल्यावर ते गाडी चढत असताना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या पँटच्या खिशातील १ लाख ३५ हजार रुपयांचा आयफोन चोरुन नेला.

त्याचप्रमाणे प्रगती एक्सप्रेसमध्ये (Pragati Express) चढत असताना एका १९ वर्षाच्या तरुणीच्या खिशातून चोरट्याने मोबाईल लांबविला. हा प्रकार मंगळवारी २६ डिसेंबर रोजी सकाळी पावणे आठ वाजता घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

अशा प्रकारे विरार येथील २७ वर्षाचे आर्किटेक्चर हे पुण्यात आले होते. ते २४ डिसेंबरला पुणे रेल्वे स्टेशनवरुन मुंबईला
जात असताना प्लॉटफॉर्म ६ वर हुजुरसाहिबा एक्सप्रेसमध्ये ते चढत असताना त्यांच्या खिशातील मोबाईल चोरट्याने लांबविला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Related Posts