IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | घरखर्चासाठी पैसे न दिल्याने पत्नीकडून पतीचा खून, दिघी परिसरातील घटना

by sachinsitapure
Murder

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पतीने घर खर्चासाठी पगाराचे पैसे न दिल्याने पत्नीने पतीचा खून (Murder of Husband) केल्याची धक्कादायक घटना दिघी परिसरात (PCPC Police) घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.18) दुपारी सव्वा एकच्या सुमारास दिघी येथील भारतमातानगर येथे घडली आहे. याप्रकरणी पत्नीवर खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

रवींद्र बाबुलाल नागरे Rabindra Babulal Nagre (वय-39 रा. भारतमाता नगर, दिघी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर भारती रवींद्र नागरे हिच्यावर आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत मयत रवींद्र नागरे याच्या बहिणीने दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) गुरुवारी (दि.21) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र नागरे हे दिघी परिसरातील एका पेट्रोल पंपावर काम करत होते.
घर खर्चासाठी पगाराचे पैसे दिले नाहीत याकारणावरुन पती-पत्नीमध्ये वाद होऊन झटापट झाली.
यानंतर आरोपी पत्नीने रवींद्र याला हाताने मारहाण केली.

तसेच त्याच्या चेहऱ्यावर हाताच्या नखाने वरखाडे ओढुन त्याला सोफ्यावर जोरात ढकलले. त्यामुळे रवींद्र यांच्या नाकाला, गळ्याला, कपाळाला गंभीर दुखापत झाली. यानंतर पत्नीने रवींद्र याचा ड्युटीचा शर्ट नाकावर दाबून त्याला जीवे ठार मारले. रवींद्र याच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपी पत्नीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिमसेन शिखरे (PSI Bhimsen Shikhare) करीत आहेत.

Related Posts