IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : फिरायला नेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

by sachinsitapure
Molestation Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | फिरायला नेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला मित्राच्या घरी नेले. त्याठिकाणी तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Pune Minor Girl Rape Case) ठेवले. पीडित मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2023 या कालवधीत एरंडवणे व कोंढवा येथील मित्राच्या रुमवर घडला आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) सोमवारी (दि.1) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरुन अतिष शिंदे Atish Shinde (वय-20 पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 376, 366, 506 सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतिष शिंदे याने पीडित मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने कोंढवा
येथील मित्राच्या रुमवर नेले. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्यासोबत जबरदस्तीने
शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने मुलीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
तसेच याबाबत कोणाला सांगितले तर आई-वडिलांचे हातपाय तोडण्याची धमकी दिली.
दरम्यान, पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.
पीडित मुलीवर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक खेडकर (PSI Deepak Khedkar) करीत आहेत.

Related Posts