IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | ते होते 13 वर्ष पोलीस पाटील, आता पुढे आले त्यांना तीन अपत्य; शासनाची फसवणुक केल्याने निलंबित

by sachinsitapure
Police Patil Suspended

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | त्यांची २००९ मध्ये पोलीस पाटील (Police Patil) म्हणून नियुक्ती करण्यात आली. तब्बल १३ वर्ष त्यांनी पोलीस पाटील म्हणून काम पाहिले. त्यानंतर आता त्यांना तीन अपत्य असल्याचे समोर आले. त्यामुळे शासनाची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर (Baramati Sub Divisional Officer Vaibhav Navadkar) यांनी या पोलीस पाटीलाला निलंबित (Suspended) केले आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

शरद जगदाळे असे या पोलीस पाटलाचे नावे आहे. इंदापूर तालुक्यातील टणू गावाचे ते पोलीस पाटील होते. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

टणू गावचे पोलीस पाटील शरद जगदाळे (Police Patil Sharad Jagdale) यांना २००५ चे अगोदर २ अपत्य होते. त्यानंतर २००७ नंतर त्यांना आणखी एक अपत्य झाले. २००९ मध्ये शरद जगदाळे यांची पोलीस पाटील म्हणून नियुक्ती झाली. सोमनाथ चंद्रकांत मोहिते Somnath Chandrakant Mohite (रा. टणु, ता. इंदापूर) यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात याबाबत तक्रार केली होती़ इंदापूर तहसीलदारांमार्फत याची सखोल चौकशी करण्यात आली. त्यात शरद जगदाळे यांना तीन अपत्ये असल्याचे सिद्ध झाले. शासनाचा दोन अपत्य असल्याचा कायदा २००५ चे उल्लघंन करुन शासनास खोटी कागदपत्रे सादर केली व शासनाची फसवणूक केल्याने शरद जगदाळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

Related Posts