IMPIMP

Pune Pimpri Crime | संतापजनक ! अल्पवयीन मुलाचा 23 वर्षाच्या दिव्यांग मुलीवर बलात्कार

by nagesh
Pune Pimpri Crime | 23 years old woman physical abused by minor boy in pimpari chinchwad of pune crime news

पुणे : सरकारसत्ता  ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवडमध्ये 23 वर्षीय दिव्यांग तरुणीवर अल्पवयीन मुलाने (Minor Boy) बलात्कार (Rape In Pune) केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (MIDC Bhosari Police) घराशेजारी राहणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली (Pune Pimpri Crime) दिली आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (MIDC Bhosari Police Station) फिर्याद दिली. हा प्रकार 16 मे आणि 18 मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी यांच्या राहत्या घरात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आई आणि मावशीसोबत राहते. दोघीही कामावर जात असल्याने घरात पीडित तरुणी एकटीच होती. याचाच फायदा घेऊन शेजारी राहणारा अल्पवयीन मुलागा घरात घुसला. त्याने 16 आणि 18 मे या दोन दिवशी या तरुणीवर बलात्कार केला. (Pune Pimpri Crime)

पीडित तरुणीची मावशी बुधवारी (दि. 18) दुपारी घरी परतली असता तरुणी अस्वस्थ आणि घाबरलेली दिसली. खोलीचा पडदा देखील व्यवस्थित लावल्याचे मावशीच्या लक्षात आले. तरुणी दिव्यांग असल्यामुळे ती हे काम करु शकत नाही. त्यामुळे मावशी आणि आईने आजूबाजूला चौकशी केली. शेजारी राहणाऱ्या 14 वर्षाच्या मुलाने मुलीवर बलात्कार केल्याचा संशय आल्याने दोघींनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पीडित तरुणीच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान मुलाने 16 आणि 18 मे रोजी घरात कोणी नसताना तिच्यावर दोनवेळा बलात्कार केल्याची कबुली दिली. आरोपीला समजपत्र देऊन वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Pimpri Crime | 23 years old woman physical abused by minor
boy in pimpari chinchwad of pune crime news

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Nana Patole on Aditya Thackeray | नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘आमच्या गुडलकमुळेच तुम्ही सत्तेत आहात’

Maharashtra Police Recruitment 2022 | महाराष्ट्रात लवकरच 7 हजार पदांसाठी पोलीस भरती

MNS Chief Raj Thackeray – Ajit Pawar | राज ठाकरेंनी अजित पवारांचं ‘ते’ आव्हान स्विकारलं? पुण्यात ‘या’ दिवशी होणार ‘राज’गर्जना

Ajit Pawar On Journalist | सवाल करताच अजित पवार वैतागले; म्हणाले – ‘हम बहुत गंभीर है, अभी स्टॅम्प पेपरपे लिखके दू’

Aurangabad Crime | 20 वर्षाच्या तरुणीच्या डोक्यात रॉडने वार करुन गळा आवळून खून, मित्र फरार

Related Posts