IMPIMP

Pune Pimpri Crime | घराचे खरेदीखत करून देण्याच्या बहाण्याने महिलेची 32 लाखांची फसवणूक, भोसरीमधील प्रकार

by nagesh
Pune Crime News | 10 percent interest on money given for trading! 99 lakhs fraud by loss, case filed in Chandannagar police station

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Pimpri Crime | येथील गुंठे क्षेत्रावर असलेल्या आरसीसी बांधकामातील घरासह खरेदी खत करून देतो,
असे सांगून महिलेची 32 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) भोसरी
येथील सर्व्हे नंबर 137 येथे 16 मे 2019 ते 29 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी एका महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका महिलेसह नितीन छगन भांडवलकर (रा. वाटेफळ, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) यांच्यावर आयपीसी 420, 406, 467, 468 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना भोसरी येथील सर्वे नं. 137 हिस्सा नं. 1/1 मधील
गुंठा क्षेत्रावर असलेले आरसीसी बांधकामातील घरासह खरेदी खत करून देतो असे सांगितले.
त्याबदल्यात आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात 32 लाख 50 हजार
रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतरही आरोपींनी दुय्यम निबंधक कार्य़ालयातून खरेदी खत करून दिले नाही.
फिर्य़ादी यांनी घर नावावर करून देण्याची वारंवार मागणी केल्यानंतर आरोपींनी कधीही रद्द न होणारे कुलमुख्यारपत्र
व त्याआधारे साठेखत तसेच नोटरी करून फिर्यादी यांची दिशाभूल केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर
फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरुद्ध तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | 32 lakh fraud of a woman on the pretext of giving money for the purchase of a house, a case in Bhosari

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार, भोसरी परिसरातील प्रकार

Pune ACB Trap | 2 लाखांची लाच मागून 30 हजार घेताना पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील दीपक क्षीरसागरसह दोघांना अटक, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

 

 

Related Posts