IMPIMP

Pune Pimpri Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! अपहरण झालेल्या 7 वर्षाच्या मुलाचा खून, पिंपरीतील बिल्डरकडे मागितली होती 20 कोटीची खंडणी

by nagesh
Pune Pimpri Crime | construction businessman pune pimpri chinchwad builders son kidnapped and murdered crime news

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | बेपत्ता झालेल्या सात वर्षाच्या मुलाचे अपहरण (Kidnapping) झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलाचा शोध सुरु केला. मात्र, अपहरण झालेल्या चिमुरड्याचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अपहरणकर्त्यांनी बांधकाम व्यावसायिक (Construction Professional) असलेल्या मुलाच्या वडिलांकडे 20 कोटीची खंडणी (Extortion) मागितली होती. आदित्य गजानन ओगले Aditya Gajanan Ogle (वय-7) असे खून (Murder) झालेल्या मुलाचे नाव आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत त्याचे वडील गजानन श्रीकांत ओगले Gajanan Srikanth Ogle (वय-49 रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी 8 सप्टेंबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) तक्रार दिली होती. पोलिसांनी आरोपी मंथन किरण भोसले Manthan Kiran Bhosale (रा. मासुळकर कॉलनी (Masulkar Colony), पिंपरी) आणि अनिकेत श्रीकृष्ण समुद्रे Aniket Srikrishna Samudre (रा. घरकुल, निगडी) यांना अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य गुरुवारी सायंकाळी खेळायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी आला नसल्याने आई-वडिलांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडत नसल्याने वडिलांनी पिंपरी पोलिसांकडे धाव घेत मुलगा बेपत्ता (Boy Missing) झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक तपास करुन गुंडा विरोधी पथकाने सोसायटीत राहणाऱ्या आरोपी मंथन याच्याकडे कसून चौकशी केली. सुरुवातीला मंथन याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

 

दरम्यान तपास पथकातील हरीश माने (API Harish Mane) यांनी मंथन याला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यावेळी मंथन याने साथीदार अनिकेत याच्या मदतीने आदित्यचा गळा दाबून खून करुन मृतदेह भोसरी एमआयडीसी (Bhosari MIDC) येथील एका कंपनीच्या पडक्या इमारतीच्या टेरेसवर फेकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आदित्यचा मृतदेह ताब्यात घेतला.

 

मयत आदित्य याचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत.
आरोपींनी त्यांच्याकडे वीस कोटी रुपये खंडणी मागितली होती.
त्यामुळे आरोपींनी आदित्याचा पैशासाठी खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत.
परंतु पोलिसांनी यामध्ये वेगळाच संशय व्यक्त केला आहे.
कारण आरोपी आणि ओगले हे एकाच सोसायटीत राहत होते.
त्यामुळे त्यांच्यात काही वाद होते याचा तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | construction businessman pune pimpri chinchwad builders son kidnapped and murdered crime news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ATM वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले चोरटे मंगळवार पेठेतून अटकेत

Pune Crime | सिरम इन्स्टिट्युटची तब्बल 1 कोटींची फसवणूक

Beauty Tips | तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने Face Serum चा वापर करता का? मग व्हा सावध!

Bank Account Minimum Balance | SBI-HDFC-ICICI Bank साठी मोठी बातमी, दंड वाचवण्यासाठी आजच करा हे काम

 

Related Posts