IMPIMP

Pune Crime | ATM वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले चोरटे मंगळवार पेठेतून अटकेत

by nagesh
Pune Crime News | Drugs worth 11 lakh seized in two operations in Pune; Catha Idulis Khat, drugs seized for the first time, two foreign nationals arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | शहरात गणेशोत्सवाची धुमधाम असतानाच आडबाजूला थांबून एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना समर्थ पोलिसांनी (Samarth Police) जेरबंद केले आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तुषार कामठे (वय २०), नामदेव पांचाळ (वय २५) आणि ओम नगरकर (वय १९, रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ अन्य ६ ते ८ जण पळून गेले. (Pune Crime)

 

याप्रकरणी पोलीस अंमलदार लखन शेटे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १६१/२२) दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलीस ठाण्यातील (Samarth Police Station) पथक गस्त घालत असताना शुक्रवारी पहाटे ४ वाजता काही जण मंगळवार पेठेतील सदानंदनगर (Mangalwar Peth, Sadanandnagar, Pune) येथे बसस्टॉपवर संशयास्पदरित्या जमा झाले होते. त्यांच्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे मिरची पुड, नायलॉन दोरी, कोयते, कटावणी, मोटारसायकल अशी घातक हत्यारे आढळून आली. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर खडी मशीन चौकातील एच डी एफ सी बँकेचे एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्यासाठी ते तयारीत होते असे सांगितले. त्यांचे साथीदार वृषभ आंदेकर व इतर अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रणदिवे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Thieves who were preparing to rob an ATM arrested from Peth on Tuesday

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सिरम इन्स्टिट्युटची तब्बल 1 कोटींची फसवणूक

Beauty Tips | तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने Face Serum चा वापर करता का? मग व्हा सावध!

Bank Account Minimum Balance | SBI-HDFC-ICICI Bank साठी मोठी बातमी, दंड वाचवण्यासाठी आजच करा हे काम

Pune Crime | दुबईहून तस्करी करुन आणलेली १ किलो १६६ ग्रॅमची सोन्याची बिस्किटे पुण्याच्या लोहगाव विमानतळावर जप्त

Amravati Love Jihad Case | काल पोलिसांना जबाब, आज तरुणीचा नवनीत राणांवर गंभीर आरोप, माझी बदनामी थांबवा… लव्ह जिहाद बनावट!

 

Related Posts