IMPIMP

Pune PMC Election 2022 | महापालिका निवडणूक! प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध होण्याच्या वेळापत्रकात बदल, ‘या’ तारखेला होणार मतदार याद्या प्रसिद्ध

by nagesh
 Pune PMC Property Tax News | Now the municipal corporation's march to the income tax arrears! Will seal the income of big arrears, charge the businessmen for change of use

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune PMC Election 2022 | महापालिका निवडणुकांच्या आरक्षण सोडतीनंतर (PMC Election Prabhag Ward Reservation Draw) प्रभाग निहाय मतदार याद्या (Voting List) अंतिम करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) महापालिकांना दिले. त्यानुसार 17 जून रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास सांगितले होते. मात्र, या वेळापत्रकामध्ये निवडणूक आयोगाने बदल केले आहेत. नव्या वेळापत्रकानुसार, 23 जून रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जणार आहे. तर 23 जुन ते 1 जुलै या कालावधीत हरकती व सूचना मागवण्यात येणार आहे. यानंतर 9 जुलैला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.(Pune PMC Election 2022)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यातील 14 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 31 मे रोजी अनुसुचित जाती, जमाती व महिला आरक्षणाची सोडत झाली. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिकांना प्रभागनिहाय मतदार याद्या (Ward Wise Voter Lists) तयार करण्याचे आदेश दिले. (Pune PMC Election 2022)

 

महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांनंतर 13 मे रोजी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली. प्रभाग रचना अंतिम करताना प्रभागांमध्ये बदल झाले असून मतदार संख्येतही बदल झाले आहेत. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर मतदार याद्या अंतिम करण्याचा कर्यक्रम निवडणूक आयोगाने 2 जून रोजी जाहीर केला. त्यानुसार 17 जून रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या.

 

मात्र, राज्य निवडणूक आयोगाने आज (गुरुवार) काढलेल्या आदेशात मतदार याद्या तयार  करण्याच्या कार्यक्रमात बदल केले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बदलण्यात आलेले वेळापत्रक खालील प्रमाणे

प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे –  23 जून 2022

प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी – 23 जून ते 1 जुलै 2022

अंतीम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करणे  – 9 जुलै 2022

 

Web Title :- Pune PMC Election 2022 | pune municipal elections the draft voter lists will be released on june 23 election commission orders release of final voter lists

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा नवा फंडा ! ट्रेडिंगमध्ये मोठा फायदा होत असल्याचे दाखवून व्यावसायिकाला सव्वा नऊ लाख रुपयांना गंडा

Gold Update Price | 15 दिवसात इतके स्वस्त झाले सोने, एकेकाळी 51,455 रुपये होता भाव

Chandrakant Patil | ‘अजित पवारांच्या अपमानाचा विषयच नाही, कारण…’ – चंद्रकांत पाटील

 

Related Posts