IMPIMP

Pune PMC Fort Competition | पुणे महानगरपालिकेची किल्ले स्पर्धा गुरुवारपासून, विजेत्यांना रोख बक्षिसे

स्पर्धेमध्ये सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, राजगड, सिंहगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, तोरणा, सिंधुदुर्ग, मल्हारगड, जंजिरा किल्ल्यांची प्रतिकृती

by sachinsitapure
Maratha Society Survey

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC Fort Competition | पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने दिवाळी निमित्ताने किल्ले स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाच्या वर्षी देखील या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा 9 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजी राजे उद्यानात ही स्पर्धा होणार आहे. किल्ले स्पर्धेत तीन विभाग केले आहेत. प्रत्येक विभाग व गटांमध्ये प्रथम क्रमांकाला 5 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 3 हजार आणि तृतीय क्रमांक 2 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट किल्ल्यास 7 हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. (Pune PMC Fort Competition)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

वाढत्या शहरीकरणामुळे राहणीमानात झालेल्या बदलांमुळे मुलांना किल्ला करण्यासाठी जागा उपलब्ध नसते. त्यामुळे किल्ले तयार करण्यासाठी जागा मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी या उद्देशाने पुणे महापालिके प्रत्येक वर्षी ही स्पर्धा आयोजित करत असून यांदाचे हे 29 वे वर्ष आहे. या स्पर्धेतील किल्ल्यांचे परीक्षण इतिहास व भूगोल तज्ज्ञ यांच्याकडून करण्यात येणार आहे. (Pune PMC Fort Competition)

या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (दि.9) दुपारी चार वाजता होणार आहे. यशस्वी स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी साडे चार वाजता होणार आहे. या स्पर्धेमध्ये सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, राजगड, सिंहगड, शनिवारवाडा, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, तोरणा, अंतुरगड, सज्जनगड, सिंधुदुर्ग, कोरीगड, पारांडा, मल्हारगड, जंजिरा, पुरंदर या किल्लाची प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. प्रदर्शन गुरुवारी सायंकाळी 4 नंतर 19 नोव्हेंबर पर्य़ंत नागरिकांना पाहण्यासाठी विनामुल्य खुले राहणार आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली.

Related Posts