IMPIMP

Pune PMC News | सार्वजनिक स्वच्छतागृहांची दैनंदीन सफाई व देखभाल दुरूस्ती यापुढे ठेकेदारांमार्फत ! पाचही झोनसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविणार – महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार

by nagesh
Pune PMC Budget | Budget of Pune Municipal Corporation on March 24; The budget is likely to be in excess of Rs 8500 crore

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune PMC News | शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची दैनंदीन देखभाल दुरूस्तीची कामे यापुढे खाजगी ठेकेदारांमार्फत केली जाणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विक्रम कुमार यांनी सांगितले, की शहरात एक हजार २०० सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत. सध्या महापालिकेच्या माध्यमातुन या स्वच्छतागृहांची स्वच्छता व देखभाल दुरूस्ती करण्यात येते. परंतू यानंतरही स्वच्छतागृहांबाबत सातत्याने तक्रारी येतात. यामध्ये प्रामुख्याने सकाळी एकवेळेसच स्वच्छता, देखभाल दुरूस्तीच्या कामांना विलंब होत असल्याने वापर न होणे अशा तक्रारींची संख्या अधिक आहे. यासाठी स्वच्छता गृहांची दैनंदीन स्वच्छता व देखभाल दुरूस्तीची कामे ठेकेदारांमार्फंत करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune PMC News)

 

महापालिकेच्या पाचही झोनसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहेत. याकरिता स्वच्छतेसाठी ५ कोटी रुपये आणि देखभाल दुरूस्तीसाठी ४ कोटी रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे. स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत क्षेत्रिय कार्यालय पातळीवर मॉनिटरींग करण्यात येईल, असेही विक्रम कुमार यांनी नमूद केले.

 

जाहिरातींच्या हक्काच्या बदल्यात अत्याधुनिक सुविधा असलेली एअर कंडीशनयुक्त सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याची तयारी काही कंपन्यांनी दाखविली आहे. यासाठी प्रायोगीक तत्वावर एका सार्वजनिक स्वच्छतागृहाची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती विक्रम कुमार यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ड्रेनेजलाईन सफाई मुख्य खात्यामार्फतच

शहरातील ड्रेनेज लाईन व चेंबर सफाईची कामे दोन मोठ्या मशिन्सद्वारे सुरू आहेत.
तसेच अंतर्गत ड्रेनेज लाईन सफाईसाठी जेटींग मशीन्सचा वापर करण्यात येत आहे.
मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज सफाईची कामे मोठ्या मशिन्सद्वारे करण्यात येणार आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर या कामांना गती देण्यात आली आहे, अशी माहितीही विक्रम कुमार यांनी दिली.

 

 

Web Title :- Pune PMC News | Daily cleaning and maintenance of public toilets no longer by contractors Tender process will be implemented soon for all the five zones Municipal Commissioner and Administrator Vikram Kumar

 

हे देखील वाचा :

Pune PMC Medical Education Trust | भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी शिक्षक व कर्मचारी भरती होणार

Ajit Pawar | ‘देहूमधील कार्यक्रमाबद्दल मला काहीच बोलायचे नाही’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Nitin Gadkari | नितीन गडकरींची मोठी घोषणा ! चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो काढा आणि 500 रुपये मिळवा

 

Related Posts