IMPIMP

Pune PMC Water Supply News | पुण्यात 18 मे पासून दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहाणार ! पावसाळा लांबण्याचा अंदाज असल्याने महापालिकेचा निर्णय

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आवाहन

by nagesh
Pune PMC Water Supply News | Water supply will be closed every Thursday from May 18 in Pune! Municipal Corporation's decision as the rainy season is expected to be prolonged

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC Water Supply News | अल निनो (El Nino) वादळाच्या प्रभावामुळे यंदा पावसाळा विलंबाने येण्याची आणि पावसाचे प्रमाण कमी राहाण्याची शक्यता असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरूवार दि. १८ मे पासून प्रत्येक आठवड्याच्या गुरूवारी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे (Water supply to the city will be shut off on Thursday). पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाचे प्रमाण पाहून पाणी पुरवठ्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच गुरूवारी पाणी पुरवठा बंद ठेवल्यानंतर दुसर्‍या, तिसर्‍या दिवशी पाणी पुरवठा विस्कळीत होण्याच्या तक्रारी तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी केले आहे. (Pune PMC Water Supply News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अल निनो वादळामुळे यंदा संपुर्ण देशभरात पावसाचे प्रमाण कमी राहाणार असल्याचा तसेच पाउस विलंबाने पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने सर्वच स्थानीक स्वराज्य संस्थांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांनी देखिल सर्वच स्थानीक स्वराज्य संस्थांशी वेळोवेळी संवाद साधून उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्याचे आणि पर्यायी व्यवस्था उभारायच्या सूचना केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर मागील महिन्यांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये १५ मे पर्यंत पाणी पुरवठा यंत्रणेत अत्यावश्यक दुरूस्ती करून नियोजन करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने पाणी पुरवठा बंद ठेवल्यास पाईपलाईनमध्ये हवेचा दाब निर्माण होउन दुसर्‍या व तिसर्‍या पाणी पुरवठा विस्कळीत होत असलेल्या २० ठिकाणी एअर व्हॉल्व बसविले आहेत. सोमवारी या वॉल्व्हची टेस्टिंग करण्यात आली असून पाणी पुरवठा अधिकाअधिक सुरळीत राहील, असा विश्‍वास प्रशासनाने काल पालकमंत्री पाटील (Chandrakant Patil) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला आहे. पाटील यांच्याशी चर्चेनंतर गुरूवार १८ मे पासून प्रत्येक गुरूवारी संपुर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहीती महापालिका आयुक्त विक्रम कुमार व पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar PMC) यांनी दिली. (Pune PMC Water Supply News)

 

विक्रम कुमार यांनी सांगितले, की शहराचा आकार बशी सारखा असल्याने पाणी पुरवठ्यात अडचणी येतात. एक दिवस पाणी बंद ठेवल्यास काही भागात दुसर्‍या दिवशी पाणी पुरवठ्यात अडचणी येतात. रिकाम्या पाईपलाईनमध्ये हवेचा दाब निर्माण होत असल्याने येत असलेल्या या अडचणीवर मात करण्यासाठी २० ठिकाणी एअर व्हॉल्व बसविण्यात आले आहेत. त्यामुळे ही अडचण बर्‍याच अंशी कमी होणार आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींसाठी चोवीस तास हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यंदा पाउस कमी असल्याने पुढील काळासाठी जिल्हाधिकारी स्तरावर व्यवस्थापन करण्यासाठी बैठक झाली आहे. यामध्ये शहरातील व लगतच्या गावांतील पाण्याच्या स्त्रोतांची माहिती घेतली जात आहे. तसेच जलतरण तलाव बंद ठेवणे, बांधकामांना एसटीपीतून पाणी देणे, वॉशिंग सेंटर बंद ठेवणे आदी बाबींवर चर्चा झाली आहे.

 

पुढील गुरूवारपासून आठवड्याच्या प्रत्येक गुरूवारी पाणी पुरवठा बंद ठेवल्यास चा १५ ऑगस्टपर्यंत साधारण एक टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. सध्या खडकवासला (Khadakwasla Dam Pune) धरणसाखळीत ९.७० टीएमसी पाणीसाठा आहे.
मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा अर्धा टीएमसी (TMC) पाणी अधिक आहे.
परंतू हवामान खात्याने यंदा पावसाळा लांबणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने आतापासूनच पाण्याच काटकसरीने वापर करावा लागत आहे.
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

– विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक

 

 

Web Title :-  Pune PMC Water Supply News | Water supply will be closed every Thursday from May 18 in Pune!
Municipal Corporation’s decision as the rainy season is expected to be prolonged

 

हे देखील वाचा :

Pune Mahavitaran News | तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणाऱ्या 16 हजारांवर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित;
आणखी 71 हजार थकबाकीदारांची होणार बत्ती गुल

Pune PMC Water Supply News | पुण्यात दि. 18 मे पासून आठवडयातून एक दिवस पाणी कपात,
‘या’ दिवशी बंद राहणार शहराचा पाणी पुरवठा

Maharashtra Politics News | …तेव्हा भूजबळ, खडसेंना खोके दिले होते का?, शिंदे गटाचा शरद पवारांवर हल्लाबोल

 

Related Posts